'जॉसने 800 धावा केल्यात? मी असतो तर 1600 केल्या असत्या'

Yuzvendra Chahal Say Jos Buttler Scored 800 Runs If I Was Opener Batsmen Would Scored 1600 Runs
Yuzvendra Chahal Say Jos Buttler Scored 800 Runs If I Was Opener Batsmen Would Scored 1600 Runs esakal

अहमदाबाद : आयपीएलच्या 15 व्या हंगामाची फायनल आज अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर आज ( दि. 29) होणार आहे. गुजरात टायटन्स Gujarat Titans) आणि राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) यांच्यात हा सामना होणार आहे. राजस्थानचा सलामीवीर जॉस बटलर (Jos Buttler) सध्या तुफान फॉर्ममध्ये त्याने यंदाच्या हंगामात 16 सामन्यात 58.85 च्या सरासरीने चार शतक आणि चार अर्धशतकांच्या मदतीने 824 धावा केल्या आहेत. एका आयपीएल हंगामात 800 पेक्षा जास्त धावा करणारा तो तिसरा फलंदाज ठरला. यापूर्वी विराट कोहलीने 2016 च्या हंगामात 973 धावा केल्या होत्या. तर डेव्हिड वॉर्नरने ही 2016 मध्येच 848 धावा केल्या होत्या. बटलरने विराट कोहलीच्या एका हंगामात चार शतक ठोकण्याच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. गुजरातविरूद्धच्या फायनल सामन्यात बटलरला डेव्हिड वॉर्नरला मागे टाकण्यासाठी 24 धावांची गरज आहे. तर विराटला मागे टाकण्यासाठी दीडशतकी खेळी करण्याची गरज आहे. मात्र असे असले तरी जॉस बटलरला त्याच्यात संघातून आव्हान मिळाले आहे. बटलरने 800 धावा केल्यात? मी असतो तर 1600 धावा केल्या असत्या असे म्हणते एकप्रकारे राजस्थानचा फिरकी जादुगार युझवेंद्र चहलने (Yuzvendra Chahal) आव्हानच दिले आहे.

Yuzvendra Chahal Say Jos Buttler Scored 800 Runs If I Was Opener Batsmen Would Scored 1600 Runs
IPL 2022 जिंकणाऱ्या संघाला किती रक्कम मिळणार?

राजस्थान रॉयल्सने आपल्या इन्स्टाग्राम (Instagram) अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत युझवेंद्र चहल म्हणतो की, 'जॉस भाईने 800 धावा केल्यात? जर मी सलामीवीर असतो तर 1600 धावा केल्या असत्या.' हा व्हिडिओ सुरू असतानाच मागून एकाने 1000 धावा असे बोलले. या व्हिडिओत युझवेंद्र चहल बरोबरच संघाचा गोलंदाजी प्रशिक्षक लसिथ मलिंगा देखील दिसत आहे. लसिथ मलिंगा चहलला म्हणाला की, तुला सलामीला काही संधी मिळाली नाही. यावर चहल म्हणाला की, मी ऑफ स्पिन गोलंदाजी देखील करू शकतो. यावर मागून एकजण म्हणाला की, बॅक हँड स्लोअर बॉल, नकल बॉल. यावर चहल म्हणाला की, रॉ पेस पहिला चेंडू 115 किलोमिटर प्रती तास वेगाने टाकावा लागले. ते विचार करतील की हा तर छोटा आहे टाकू शकणार नाही. पुढचा चेंडू बूम फिनिश 165 किलोमिटर प्रती तास आरामात.' या व्हिडिओला आतापर्यंत 5 लाख व्हूज मिळाले आहेत.

Yuzvendra Chahal Say Jos Buttler Scored 800 Runs If I Was Opener Batsmen Would Scored 1600 Runs
'या' टॉप क्लास खेळाडूंना IPL २०२२ मध्ये मिळाली नाही संधी

आयपीएलच्या यंदाच्या हंगामाची सांगता अहमदाबादमध्ये होणार आहे. या सामन्यासाठी जवळपास 1 लाख 30 हजार प्रेक्षक उपस्थित राहण्याची शक्यता आहे. गुजरात टायटन्सचा हा पहिलाच हंगाम आहे. त्यामुळे गुजरातला पहिल्याच हंगामात विजेतेपदाला गवसणी घालण्याची संधी आहे. तर राजस्थानने आयपीएलचा पहिला वहिला हंगाम जिंकला होता. मात्र त्यानंतर त्यांना फायनल गाठण्यात अपयश आले होते. आता ते 14 वर्षानंतर फायनलमध्ये पोहचले असून ते देखील विजेतेपद पटकावण्यासाठी उत्सुक असतील.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com