'या' टॉप क्लास खेळाडूंना IPL २०२२ मध्ये मिळाली नाही संधी

आयपीएलच्या या महाकुंभात असे काही खेळाडू आहेत ज्यांना खेळण्याची संधी मिळाली नाही.
'या' टॉप क्लास खेळाडूंना IPL २०२२ मध्ये मिळाली नाही संधी
esakal

यंदाच्या आयपीएल १५ व्या सीझनमध्ये युवा क्रिकेटर्सचा जलवा पाहायला मिळाला. पदार्पण केलेल्या युवा खेळाडूंनी आयपीएलचे मैदान चांगलेच गाजवले आहे. त्यामधील अनेक खेळाडूंनी आपल्या कमालीच्या खेळीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. मात्र, आयपीएलच्या या महाकुंभात असे काही खेळाडू आहेत ज्यांना खेळण्याची संधी मिळाली नाही.

'या' टॉप क्लास खेळाडूंना IPL २०२२ मध्ये मिळाली नाही संधी
IPL 2022 मध्ये 'या' संघांनी केली लाजीरवाणी कामगिरी

मोहम्मद नबी

अफगाणिस्तानचा ऑलराऊंड मोहम्मद नबी हा त्या खेळाडूंच्या यादीत आहे. ज्यांना आयपीएलमध्ये खेलण्याची संधी मिळाली नाही. त्याने आयपीएलच्या कारकिर्दीत 17 मॅच खेळल्या आहेत. यादरम्यान त्याने १८० धावा केल्या आहेत. तर २ विकेट आपल्या नावावर केल्या आहेत.

मेगा ऑक्शनदरम्यान केकेआरने त्याला १ कोटीत खरेदी केलं. आपल्या इंटरनॅशनल करिअरमध्ये नबीने आपली वेगळी ओळख केली आहे. टी २० इंटरनॅशनलमध्ये नबीने ८८ सामने खेळले आहेत. त्यामध्ये त्याने १५३९ धावा केल्या आहेत. तर ७४ बळी टिपले आहेत.

तसेच टी २० करिअरमध्ये नबीने ४९९६ धावा आणि ३०२ विकेट आपल्या नावावर केल्या आहेत. इतका चांगला परफॉर्म असूनही त्याला त्याला यंदाच्या सीझनमध्ये खेळण्याची संधी मिळाली नाही.

'या' टॉप क्लास खेळाडूंना IPL २०२२ मध्ये मिळाली नाही संधी
IPL मध्ये मोस्ट व्हॅल्यूबल प्लेअरची निवड कशी केली जाते?

लुंगी एनगिडी

यंदाच्या सीझनमध्ये साऊथ अफ्रिकेचा वेगवान गोलंदाज लुंगी एनगिडी संपूर्ण सीझनमध्ये बँचवर बसला असल्याचे पाहायला मिळाले. त्याने या सीझनमध्ये एकही सामना खेळला नाही.

आयपीएल मेगा ऑक्शनदरम्यान दिल्ली कॅपिटल्सने ५० लाखात खरेदी केलं होत. त्याने चेन्नईकडून खेळताना चांगला परफॉर्म केला होता. मात्र, दिल्लीने त्याला संधी दिली नाही.

जेसन बेहरेनडोर्फ

यंदाच्यावर्षी ऑस्ट्रेलियाचा सन बेहरेनडोर्फने एकही मॅच खेळली नाही. त्याने बिग बॅश लीग २०२१-२२ मध्ये बेहरेनडोर्फने १३ मॅचमध्ये १६ विकेट घेतल्या होत्या. त्याची गोलंदाजी कमालीची राहिली आहे. मात्र, फ्रेंजायजीने त्याला एकही मॅच खेळण्याची संधी दिली नाही. आयपीएल ऑक्शनदरम्यान, आरसीबीने ७५ लाखात आपल्या ताफ्यात घेतलं होतं.

ईशान पोरेल

भारताचा युवा फलंदाज ईशान पोरेलचा पंजाब किंग्जने २५ लाख देत आपल्या ताफ्यात समावेश केला होता. मात्र, फ्रेंचायझीने त्याला खेळवलं नाही. पोरेल एक प्रतिभाशाली गोलंदाज आहे. त्याने आत्तापर्यंत ६.७१ च्या सरासरीने टी २० मध्ये गोलंदाजी केली आहे. टी २० मध्ये त्याच्या नावावर ३० विकेट्सची नोंद आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com