Iraq : बगदादमधील फुटबॉल स्टेडियमजवळ भीषण स्फोट; 10 ठार तर 20 हून अधिक जखमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Gas Tanker Explosion Near Football Stadium

मृत आणि जखमींमध्ये फुटबॉल खेळणाऱ्या खेळाडूंचा समावेश आहे.

Iraq : बगदादमधील फुटबॉल स्टेडियमजवळ भीषण स्फोट; 10 ठार तर 20 हून अधिक जखमी

इराकची राजधानी बगदादमध्ये (Baghdad Iraq) फुटबॉल स्टेडियमजवळ (Football Stadium) स्फोट झाला आहे. या दुर्घटनेत 10 जणांचा मृत्यू झाला, तर 20 हून अधिक जण जखमी झाले आहेत. रिपोर्टनुसार, फुटबॉल खेळत असताना हा स्फोट झाला.

मृत आणि जखमींमध्ये फुटबॉल खेळणाऱ्या खेळाडूंचा समावेश आहे. रिपोर्टनुसार, स्टेडियमजवळ उभ्या असलेल्या गॅस टँकरमध्ये (Gas tanker) हा स्फोट झाला. स्फोट इतका जोरदार होता की, आजूबाजूच्या घरांच्या खिडक्या आणि दरवाजे हादरू लागले. तसेच घटनास्थळाजवळ उभ्या असलेल्या अनेक वाहनांचंही नुकसान झालंय.

हेही वाचा: Cylinder Explosion : औरंगाबादमध्ये गॅस सिलिंडरचा मोठा स्फोट; आगीत 7 पोलिसांसह 30 जण होरपळले, 10 जण गंभीर

इराकचे राष्ट्राध्यक्ष अब्दुल लतीफ रशीद (President of Iraq Abdul Latif Rashid) यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिलेत. या दुर्घटनेला जबाबदार असणाऱ्यांना शिक्षा करण्याचंही आदेश त्यांनी दिले आहेत.

हेही वाचा: राहुल गांधींनी आदिवासी महिलांसोबत केला 'कोम्मू डान्स', VIDEO पाहून तुम्हीही म्हणाल 'क्या बात है'

सोमालियाच्या राजधानीत 2 स्फोट

त्याच वेळी, सोमालियाची राजधानी मोगादिशूमध्ये शनिवारी एका प्रमुख सरकारी कार्यालयाजवळ गर्दीच्या ठिकाणी दोन स्फोट झाले. यात अनेक नागरिकांचा मृत्यू झाला. सोमालिया नॅशनल न्यूज एजन्सीनं पोलिस प्रवक्ते सादिक डोदिशे यांच्या हवाल्यानं म्हटलंय की, 'दोन कारमध्ये हा बॉम्ब स्फोट झाला आहे. अनेक जखमींना रुग्णालयात नेण्यात आलं असून घटनास्थळावरून अनेक मृतदेह आणण्यात आले आहेत.'