राहुल गांधींनी आदिवासी महिलांसोबत केला 'कोम्मू डान्स', VIDEO पाहून तुम्हीही म्हणाल 'क्या बात है'

काँग्रेस नेते राहुल गांधी सध्या पक्ष मजबूत करण्यासाठी भारत जोडो यात्रा करत आहेत.
Rahul Gandhi Bharat Jodo Yatra News
Rahul Gandhi Bharat Jodo Yatra Newsesakal
Summary

काँग्रेस नेते राहुल गांधी सध्या पक्ष मजबूत करण्यासाठी भारत जोडो यात्रा करत आहेत.

Bharat Jodo Yatra News : काँग्रेस नेते राहुल गांधी (Congress Leader Rahul Gandhi) सध्या पक्ष मजबूत करण्यासाठी भारत जोडो यात्रा (Bharat Jodo Yatra) करत आहेत. यावेळी ही यात्रा तेलंगणात पोहोचलीय. या दौऱ्यात राहुल गांधी विविध क्षेत्रातील लोकांच्या भेटी घेत असून त्यांच्या समस्या जाणून घेत आहेत.

यादरम्यान वृद्ध महिलांपासून ते लहान मुलांपर्यंत त्यांना भेटण्यासाठी आणि प्रवासात सहभागी होण्यासाठी लोक येत आहेत. याचा व्हिडिओ-फोटो काँग्रेस पक्षाकडून वेळोवेळी शेअर केला जात आहे. आता शनिवारी राहुल गांधींचा आणखी एक व्हिडिओ समोर आलाय. यामध्ये राहुल गांधी तेलंगणातील आदिवासी समुदायाच्या (Telangana Tribal Community) सदस्यांसोबत नाचताना दिसत आहेत.

Rahul Gandhi Bharat Jodo Yatra News
Election Commission : 1 नोव्हेंबरला गुजरात निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता; दोन टप्प्यात होणार मतदान!

आदिवासी समाजातील सदस्यांसोबत नाचतानाचा हा व्हिडिओ काँग्रेसनं आपल्या ट्विटरवर शेअर केलाय. या व्हिडिओत राहुल गांधी आदिवासी समाजातील महिलांसोबत (Tribal women) कोम्मू डान्स (Kummi Dance) करताना दिसत आहेत. यावेळी समाजातील लोकांनी राहुल गांधींना आदिवासी मुकुटही घातला आहे. या व्हिडिओलाही लोक खूप पसंत करत आहेत.

राहुल गांधींनी आदिवासी समुदायातील सदस्यांसोबत नृत्य केल्याचा व्हिडिओ त्यांच्या ट्विटरवर शेअर केलाय. आपल्या ट्विटमध्ये त्यांनी लिहिलंय, आमचे आदिवासी बांधव संस्कृती आणि विविधतेचं भांडार आहेत. आज 'कोमू कोया' आदिवासी महिलांसोबत स्टेप बाय स्टेप डान्स करण्याची संधी मिळाली. आदिवासी समाजाची कला आणि संस्कृती जतन करण्याबरोबरच ते शिकलं पाहिजं, असं त्यांनी म्हटलंय.

Rahul Gandhi Bharat Jodo Yatra News
High Court : 15 वर्षांची मुस्लिम मुलगीही करू शकते पसंतीच्या व्यक्तीशी लग्न; कोर्टाचा मोठा निर्णय

तेलंगणात आज भारत जोडो यात्रेचा चौथा दिवस

तेलंगणामध्ये भारत जोडो यात्रेचा आज चौथा दिवस आहे. राहुल गांधी आणि त्यांची टीम आज 20 किलोमीटरहून अधिक अंतर कापणार असल्याचं मानलं जात आहे. राहुल गांधी आज संध्याकाळी जडचेर्ला एक्स रोड जंक्शन इथं 'कॉर्नर मीटिंग'मध्ये बोलणार आहेत. आजच्या भेटीत त्यांच्यासोबत अभिनेत्री पूनम कौर आणि उस्मानिया विद्यापीठाचे विद्यार्थीही सामील झाले आहेत. याशिवाय, पक्षाचे अनेक नेतेही या यात्रेशी जोडले गेले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com