IRE vs IND : 'याची अपेक्षा नव्हती...' शेवटचा टी-20 सामना रद्द झाल्यानंतर कर्णधार बुमराह संतापला!

Jasprit Bumrah
Jasprit Bumrah ESAKAL

IRE vs IND T20 Jasprit Bumrah : भारत आणि आयर्लंड यांच्यातील तिसरा आणि शेवटचा टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना संततधार पावसामुळे रद्द करावा लागला. यासह भारताने तीन सामन्यांची मालिका 2-0 अशी जिंकली. दुखापतीनंतर पुनरागमन करणारा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या नेतृत्वाखाली खेळताना भारताने पावसाने व्यत्यय आणलेला पहिला सामना DLS पद्धतीच्या आधारे 2 धावांनी जिंकला तर दुसरा सामना 33 धावांनी जिंकला.

Jasprit Bumrah
Chandrayaan 3 Mumbai Indians : चंद्र घेतला कवेत आता... मुंबई इंडियन्सने रोहितचा फोटो शेअर करत दिले मोठे संकेत

सामना रद्द झाल्यानंतर बुमराह म्हणाला की, सामना होण्याची वाट पाहणे निराशाजनक होते. आधी हवामान चांगले असल्याने आम्हाला याची अपेक्षा नव्हती. या मालिकेत भारतीय संघाचा कर्णधार म्हणून खेळताना खूप मजा आली आणि कर्णधारपद हा सन्मान आहे. पाऊस पडत असतानाही संघाचे खेळाडू उत्साही आणि उत्सुक होते.

तो पुढे म्हणाला, 'मी दुखापतीबद्दल विचार करत नाही. जेव्हा तुम्हाला तुमच्या संघाचे नेतृत्व करण्याची संधी मिळते, तेव्हा तुम्ही ती नेहमी घेता. एक क्रिकेटपटू म्हणून तुम्ही नेहमीच जबाबदारीचा आनंद लुटता. मालिकेतील सर्वोत्तम खेळाडू ठरलेला बुमराह त्याच्या दुखापतीवर म्हणाला, "सर्व ठीक आहे, कोणतीही तक्रार नाही.

Jasprit Bumrah
Shubman Gill : एकदिवसीय फलंदाजी क्रमवारीत शुभमन गिल चौथ्या स्थानावर

भारत आणि आयर्लंड यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील तिसरा आणि अंतिम सामना बुधवारी (23 ऑगस्ट) डब्लिनमध्ये रद्द करण्यात आला. संततधार पावसामुळे टॉसही होऊ शकला नाही. टीम इंडियाने मालिका 2-0 ने आपल्या नावावर केली. टीम इंडियाला क्लीन स्वीप करण्याची संधी होती, पण तिसरा सामना होऊ शकला नाही. पहिल्या आणि दुसऱ्या टी-20मध्ये त्याने यजमानांचा पराभव केला. भारताने याआधी 2018 आणि 2022 मध्येही आयर्लंडला मालिकेत हरवले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com