
चीनमध्ये नुकतीच जागतिक स्पर्धा (World Games) झाले, ज्यात एक धक्कादायक घटना घडली. इटलीचा २९ वर्षीय खेळाडू मतिया डेबर्टोलिस याचे निधन झाले आहे. तो ओरिएंटियरिंग स्पर्धेचा भाग होता. गेल्या अनेक वर्षांपासून तो या क्रीडा प्रकारात सहभागी होत होता.
मात्र, मागच्या आठवड्यात शुक्रवारी (८ ऑगस्ट) चेंगडू येथे झालेल्या मिडल डिस्टन्स प्रकारादरम्यान तो चक्कर येऊन पडला होता. त्यावेळी तो स्पर्धेच्या आयोजकांना बेशुद्ध अवस्थेत सापडला होता. त्यावेळी तिथे तीव्र उष्णता आणि ३० अंशापेक्षा अधिक तापमान होते.