Jasprit Bumrah Fitness : जसप्रीत बुमराहचं कारायचं काय; एका पाठोपाठ एक मालिकांमधून माघार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Jasprit Bumrah Fitness India Vs Australia Test Series

Jasprit Bumrah Fitness : जसप्रीत बुमराहचं कारायचं काय; एका पाठोपाठ एक मालिकांमधून माघार

Jasprit Bumrah Fitness : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 9 फेब्रुवारीपासून बॉर्डर गावसकर ट्रॉफी कसोटी मालिका सुरू होत आहे. या मालिकेत चार कसोटी सामने खेळले जाणार आहे. निवडसमितीने पहिल्या दोन सामन्यांसाठी संघाची घोषणा आधच केली आहे.

या संघात दुखापतीतून सावरत असलेल्या रविंद्र जडेजाचा समावेश करण्यात आला आहे. मात्र वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहचा समावेश करण्यात आलेला नाही. संघाची घोषणा पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी केली असल्याने शेवटचे दोन कसोटी सामने बुमराह खेळण्याची शक्यता वर्तवली जात होती.

हेही वाचा: Novak Djokovic VIDEO : आईवरचं प्रेम! जोकोविचनं सामन्यानंतर केलं असं काही की...

दरम्यान, बीसीसीआयच्या एका सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार जसप्रीत बुमराह ऑस्ट्रेलिया विरूद्धची संपूर्ण कसोटी मालिका मुकण्याची दाट शक्यता आहे. बीसीसीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, 'ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या कसोटी मालिकेसाठी जसप्रीत बुमराह शंभर टक्के फिट होईल याची शक्यता फार कमी आहे. एक गोष्ट मात्र नक्की आहे की, जसप्रीत बुमराह कोणती मालिका खेळणार याचा प्रश्नच उद्भवत नाही.'

'कारण निवडसमिती आता पुन्हा घाई गडबडीत कोणाताही निर्णय घेणार नाही. पाठीची दुखापत बरी होण्यास वेळ लागतो. सध्याच्या घडीला तो निवडीसाठी अनफिट आहे. तो कधीपर्यंत मैदानावर परतेल याबाबत देखील साशंकता आहे. यासाठी एक महिना किंवा त्यापेक्षाही जास्त काळ लागू शकतो.'

हेही वाचा: Australian Open Sania Mirza : आमचं नातं सॉलिड! मी 14 वर्षाची असताना रोहन... सानिया फायनमध्ये पोहचल्यानंतर भावूक

निवडसमितीने श्रीलंकेविरूद्धच्या वनडे मालिकेसाठी त्याची निवड केली होती. मात्र त्याने ऐनवेळी मालिकेतून माघार घेतली. त्यावेळी त्याची पाठीची दुखापत अजून बरी झाली नसल्याचे कारण देण्यात आले होते. त्यानंतर तो पुन्हा एनसीएमध्ये रिहॅब करण्यासाठी गेला. काही दिवसांपूर्वीच जसप्रीत बुमराह एनसीएच्या नेट्समध्ये गोलंदाजी करताना दिसला होता. मात्र त्याला 100 टक्के फिट होण्यासाठी अजून किमान एक महिना तरी लागणार आहे.

(Sports Latest News)

हेही वाचा : 'नाटू नाटू..'ला मिळाला पुरस्कार..पण पुढे काय?