Steve Smith DRS : स्मिथ बाद नव्हता? ट्रविस हेडमुळं ऑस्ट्रेलिया आली अडचणीत

Steve Smith DRS
Steve Smith DRS esakal

Travid Head DRS : भारताचे 241 धावांचे आव्हान पार करताना आक्रमक ऑस्ट्रेलियाने पहिल्याच षटकात 15 धावा चोपल्या होत्या. त्यात डेव्हिड वॉर्नरचा एक एज लागला होता. मात्र कॅच कोणी ट्राय केला नाही.

पहिल्याच षटकात 15 धावा चोपल्यानंतर भारताचं कसं होणार ही हुरहूर लागून राहिली होती. मात्र मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराहने भन्नाट गोलंदाजी करत कांगारूंचे एका पाठोपाठ एक फलंदाज माघारी धाडले.

शमीने वॉर्नरला बाद केलं तर त्यानंतर बुमराहने मार्शला बाद केलं. मार्शनंतर आलेल्या स्टीव्ह स्मिथला देखील बुमराहने पायचित पकडले. मात्र ही विकेट्स वादग्रस्त ठरली. जर स्मिथने DRS घेतला असता तर कदाचित तो नाबाद ठरला असता.

Steve Smith DRS
Travid Head Catch Video : हेड कायम भारताला नडतो! WTC फायनलची जखम ताजी असताना आता हा कॅच

मिचेल मार्श बाद झाल्यानंतर स्टीव्ह स्मिथ आणि ट्रॅविस हेड यांनी डाव पुढे नेण्याचा प्रयत्न केला. या दोघांनी संघाला सातव्या षटकापर्यंत अर्धशतकाजवळ पोहचवले होते. ही जोडी भारतासाठी फोडणे महत्वाचे होते. तर मार्श बाद झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाला डाव सावरणे गरजेचे होते.

मात्र जसप्रीत बुमराहने सातव्या षटकाचा शेवटचा चेंडू इन स्विंग टाकला अन् स्टीव्ह स्मिथचे पॅढ वाजले. भारताने जोरदार अपिल केली. अंपायरने देखील लगेचच बोट वर केलं. स्मिथला या इन स्विंगमुळे धक्क्यात होता. त्यात भारतीय चाहते विकेटचा जल्लोष करत होते. त्याला काही समजतच नव्हते.

Steve Smith DRS
Ind vs Aus Live Score Final : तीन विकेट पडली पण... दहा ओव्हरमध्ये कांगारूंने चांगलीच धुतली

त्याने समोर उभ्या असलेल्या ट्रॅविस हेडकडे DRS घेण्याासाठी त्याची संमती मिळावी या आशेनं पाहत होता. मात्र हेडने नकारात्मक मान डोलवली अन् स्मिथ वाटेला लागला. मात्र ज्यावेळी रिप्लेमध्ये चेंडू ऑफ स्टम्पच्या बाहेर असताना पॅडवर लागला हे दिसलं त्यावेळी हेडने ऑस्ट्रेलियाचे मोठे नुकसान केल्याची भावना चाहत्यांमध्ये निर्माण झाली.

स्मिथ बाद झाल्यानंतर मात्र हेडने ऑस्ट्रेलियाच्या डावाची सूत्रं आपल्या हातात घेतली. त्याने लाबुशेनसोबत अर्धशतकी भागीदारी रचत संघाला शतकाच्या जवळ पोहचवले.

(Sports Latest News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com