INDvSL : टी 20 मध्ये बुमराच्या भारताकडून सर्वाधिक विकेट

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 10 जानेवारी 2020

भारत आणि श्रीलंका यांच्यात सुरु असलेल्या तिसऱ्या टी 20 सामन्यात जसप्रीत बुमराच्या कामगिरीत आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला. 

पुणे : भारत आणि श्रीलंका यांच्यात सुरु असलेल्या तिसऱ्या टी 20 सामन्यात जसप्रीत बुमराच्या कामगिरीत आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला. भारताकडून सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत त्याने अव्वल क्रमांक गाठला.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पहिल्याच षटकात धनुष्का गुनतिलकाला बाद करत भारताचे स्पिनर रविचंद्रन अश्विन आणि युझवेंद्र चहर यांना मागे टाकले. बुमराच्या नावावर टी 20 मध्ये भारताकडून सर्वाधिक 53 विकेट आहे. यापूर्वी अश्विन आणि चहल हे दोघेही 52 विकेटसह पहिल्या क्रमांकावर होते. 

INDvsSL : पाच वर्षांनी टी-20 खेळणाऱ्या संजूच्या नावावर अनोखा विक्रम!

भारताकडून टी20मध्ये सर्वाधिक विकेट

1. जसप्रीत बुमरा - 53
2. आर अश्विन आणि युझवेंद्र चहल - 52
3. भुवनेश्वर कुमार - 41
4. कुलदीप यादव - 39
5 .हार्दिक पंड्या - 38


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Jasprit Bumrah taken maximum wickets in T20 Match