esakal | INDvsSL : पाच वर्षांनी टी-20 खेळणाऱ्या संजूच्या नावावर अनोखा विक्रम!
sakal

बोलून बातमी शोधा

Sanju-Samson

संजूने 19 जुलै 2015मध्ये झिंबाव्बेविरुद्ध ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. तेव्हा भारतीय संघाचे नेतृत्व अजिंक्य रहाणेकडे होते.

INDvsSL : पाच वर्षांनी टी-20 खेळणाऱ्या संजूच्या नावावर अनोखा विक्रम!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

INDvsSL : पुणे : भारत आणि श्रीलंका यांच्यातील तिसऱ्या आणि अखेरच्या टी-20 सामन्यात यष्टीरक्षक म्हणून रिषभ पंतच्या ऐवजी अखेर संजू सॅमसनला संधी मिळाली. 2015 नंतर संजूला थेट शुक्रवारी (ता.10) संधी मिळाली आहे. अशातच त्याच्या नावावर एका विचित्र विक्रमाची नोंद झाली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

संजूने 2015 ते 2020 या कालावधीत भारताकडून सर्वाधिक (73) सामने मिस केले आहेत. संजूने 19 जुलै 2015मध्ये झिंबाव्बेविरुद्ध ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. तेव्हा भारतीय संघाचे नेतृत्व अजिंक्य रहाणेकडे होते. या सामन्यात भारताला पराभव स्वीकारावा लागला होता. 

- रोझरीच्या विद्यार्थ्यांशी कुलदीप यादवने साधला संवाद

या सामन्यात संजूने 24 चेंडूंमध्ये 19 धावांची खेळी केली होती. यामध्ये एका चौकाराचा समावेश होता. या सामन्यात त्याचा स्ट्राईकरेट 79.17 होता. 

- हर्षवर्धन सदगीर पुन्हा कधीच 'महाराष्ट्र केसरी'च्या रिंगणात खेळणार नाही, वाचा का?

ट्वेंटी-20 विश्वकरंडक अवघा आठ महिन्यांवर आला असताना भारतीय संघ आता खेळाडूंचे पर्याय तपासून पाहत आहे. पंतला फलंदाजीत सातत्याने येणारे अपयश आणि खराब यष्टीरक्षण यामुळे आजच्या सामन्यात संजूला संधी देण्यात आली आहे.

- Video : मराठमोळ्या स्मृतीने घेतलेला अफलातून कॅच होताेय व्हायरल

भारताकडून सर्वाधिक टी-20 मिस करणारे खेळाडू :-

संजू सॅमसन - 2015-20 - 73
उमेश यादव - 2012-18 - 65
दिनेश कार्तिक - 2010-17 - 56
महंमद शमी - 2017-19 - 43
रविंद्र जडेजा - 2017-19 - 33