
धोनीचा विक्रम जोस बटलरनं मोडला, 17 वर्षांनी केली कामगिरी
इंडियन प्रीमियर लीग 2022 मध्ये ऑरेंज कॅप जिंकणाऱ्या इंग्लंडचा यष्टीरक्षक फलंदाज बटलरची बॅट शांत होण्याच नाव काय घेत नाही. नेदरलँड्सविरुद्धच्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय मालिकेत त्याने अशीच फलंदाजी करत अनेक मोठे विक्रम केले आहे. या मालिकेमध्ये बटलरने महेंद्रसिंग धोनीचा १७ वर्षे जुना विक्रमही मोडला आहे. एकदिवसीय मालिकेत यष्टीरक्षकाकडून सर्वाधिक षटकार मारण्याचा विश्वविक्रम आता बटलरच्या नावावर आहे, याआधी हा विक्रम धोनीच्या नावावर होता.(Jos Buttler Broke 17 Year Old Record MS Dhoni)
हेही वाचा: Sidhu Moose Wala स्टाईलमध्ये सर्फराजचं 'शतकी' सेलिब्रेशन
बटलरने नेदरलँड्सविरुद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेत एकूण 19 षटकार मारले आणि त्याने धोनीचा १७ वर्षे जुना विक्रमही मोडला. बटलर आता धोनीच्या दोन षटकारांनी पुढे गेला. धोनीने 2005 मध्ये श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत 17 षटकार मारले होते. एबी डिव्हिलियर्सने 2015 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध 16 षटकार ठोकले होते. या यादीत बटलरही चौथ्या क्रमांकावर आहे. बटलरने 2019 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत 14 षटकार मारले होते.
हेही वाचा: रोहितने आंतरराष्ट्रीय पदार्पणाला 15 वर्ष पूर्ण झाल्यानंतर शेअर केले 'खास' पत्र
बटलरने या मालिकेतील तीन सामन्यांत 185.07 च्या स्ट्राइक रेटने एकूण 248 धावा केल्या. या मालिकेत तो एकदाही बाद झाला नाही. बटलरने 19 षटकारांसह 14 चौकारही लगावले. या शानदार कामगिरीसाठी बटलरला मालिकावीर म्हणूनही गौरवण्यात आले.
Web Title: Jos Buttler Broke 17 Year Old Record Mahendra Singh Dhoni Sixes In Odi Cricket
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..