Kabaddi : आशिया अजिंक्यपद कबड्डीत भारताचे शानदार विजय

दक्षिण कोरिया आणि तैपेई संघावर आपले वर्चस्व अपेक्षेप्रमाणे सिद्ध केले.
कबड्डी
कबड्डीsakal

बुसान : गतविजेत्या भारताने आशिया अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेत सलामीच्या दिवशी दोन शानदार विजय मिळवले. दक्षिण कोरिया आणि तैपेई संघावर आपले वर्चस्व अपेक्षेप्रमाणे सिद्ध केले. इराणनंतर कोरियाचा संघ ताकदवान समजला जातो, पण ताज्या दमाच्या भारतीय खेळाडूंसमोर आज कोरियाचा संघ निष्प्रभ ठरला. भारताने ७६-१३ अशा फरकाने मिळवलेल्या विजयात महाराष्ट्राच्या अस्लम इनामदारने सुपर १० अशी कामगिरी केली. नवीन कुमारऐवजी बदली खेळाडू म्हणून त्याला खेळवण्यात आले होते.

भारतीयांनी सलग नऊ गुण मिळवत जोरदार सुरुवात करताना पहिल्या अर्धात ४०-४ अशी आघाडी घेतली होती. उत्तरार्धातही हेच वर्चस्व कायम राखताना तब्बल ७६ गुणांची कमाई केली. यादरम्यान भारताने कोरियावर पाच लोण दिले. सुरजित नरवालने पकडीत छाप पाडली. त्याने सात गुण मिळवले.

दुसऱ्या सामन्यात भारतीयांनी तैपेईविरुद्ध सावध सुरुवात केली तरी ५३-१९ असा एकतर्फी विजय मिळवला. सचिन तन्वरने अष्टपैलू खेळ केला. कोरियाच्या तुलनेत तैपेईचे खेळाडू बऱ्यापैकी लढा देत होते. पहिल्या अर्धात ते केवळ तीन गुणांनीच पाठी होते; मात्र कर्णधार पवन शेरावतने १२ व्या मिनिटाला त्यांच्यावर लोण दिला आणि भारताची आघाडी १४-६, २१-१२ अशी केली.

कबड्डी
Pune Ringroad : प्रकल्पग्रस्तांना देणार नोटिसा; भूसंपादन प्रक्रिया सुरू

तैपेईच्याच्या बचाव खेळाडूंनी उत्तरार्धात भारतीयांच्या पकडी करण्याचा प्रयत्न केला, परंतु अनुभवात उजवे असलेल्या भारतीय चढाईपटूंनी गुणफलक सतत हलता ठेवला आणि तीन लोण दिले.

आजच्या आणखी एका सामना इराणने तैपेईवर ५२-२८ असा विजय मिळवला. सुरुवातीला तैपैईने आघाडी घेतली होती, मात्र त्यानंतर इराणने आपली ताकद दाखवली

भारताचा उद्या जपानविरुद्ध; तर गुरुवारी इराणशी सामना होणार आहे.

कबड्डी
Pune Crime : अधिकारी झाल्यावर लग्नास नकार दिल्याने दर्शनाचा खून; राहुल हांडोरेची कबुली

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com