AIFF President : चौबे फुटबॉल संघटनेचे नवे अध्यक्ष; भुतिया यांना मिळाले अवघे एक मत

तब्बल ८५ वर्षांचा इतिहास असलेल्या अखिल भारतीय फुटबॉल फेडरेशनला प्रथमच खेळाडू असलेला अध्यक्ष मिळाला आहे.
फुटबॉल
फुटबॉल sakal

नवी दिल्ली : तब्बल ८५ वर्षांचा इतिहास असलेल्या अखिल भारतीय फुटबॉल फेडरेशनला प्रथमच खेळाडू असलेला अध्यक्ष मिळाला आहे. माजी गोलरक्षक असलेल्या कल्याण चौबे आणि कधी काळी त्यांचा कर्णधार असलेले दिग्गज खेळाडू बायचुंग भुतिया यांच्यामधील अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा निकाल एकतर्फी लागला. चौबे यांना ३३; तर शंभराहून अधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळलेल्या भुतिया यांना अवघे एकच मत मिळाले.

४५ वर्षीय चौबे हे भाजपाचे पश्चिम बंगालमधील नेते आहेत. कोलकातामधील सुप्रसिद्ध क्लब मोहन बगानचे ते माजी गोलरक्षक होते. राजकीय क्षेत्रात ताकदवान असलेल्या गुजरात आणि अरुणाचल प्रदेश येथील संघटनांचा त्यांना मोठा पाठिंबा होता. या तुलनेत भुतिया ज्या राज्यातून पुढे आले, त्या सिक्किम राज्यानेही त्यांना पाठिंबा दिला नाही. खेळत असताना ‘सिक्किमिस स्नायपर’ म्हणून त्यांना ओळखले जात होते.

राजकीय पार्श्वभूमी असलेले कल्याण चौबे यांनी भाजपकडून पश्चिम बंगालकडून कृष्णानगरमधून विधानसभेची निवडणूक लढवली होती; परंतु त्यांचा पराभव झाला होता. चौबे यांची सिनियर गटातील फुटबॉल कारकीर्द क्लब फुटबॉलपुरतीच मर्यादित होती. भारताच्या मुख्य संघातून खेळण्याची संधी त्यांना मिळाली नाही. पण चौबे यांनी वयोगटाच्या आंतरराष्ट्रीय सामन्यात भारताचे प्रतिनिधीत्व केले आहे. भुतिया यांनी १०० पेक्षा अधिक सामने खेळले आहेत.

एकाच क्लबमधून दोघेही

चौबे मोहन बगान आणि ईस्ट बंगाल क्लबमधून खेळलेले आहे. ईस्ट बंगाल क्लबमध्ये चौबे आणि भुतिया एकाच वेळी खेळलेले आहेत. कर्नाटक फुटबॉल संघटनेचे अध्यक्ष आणि कर्नाटकचे काँग्रेसचे विद्यमान आमदार एन. ए. हॅरिस त्यांनी राजस्थानच्या मानवेंद्र सिंग यांचा उपाध्यपदाच्या लढतीत पराभव केला; तर खजिनदारपदाच्या लढतीत अरुणाचल प्रदेशच्या किपा अजय यांनी आंध्र प्रदेशच्या गोपालकृष्णा यांच्यावर मात केली.

बायचुंग भुतिया यांची कारकीर्द

बायचुंग भुतिया यांच्या नावाचा प्रस्ताव आंध्र प्रदेश संघटनेचे गोपालकृष्ण कोसाराजू यांच्याकडून. त्याला राजस्थान संघटनेचे सचिव दिलीपसिंग शेखावत यांच्याकडून मंजुरी

भारताचे यशस्वी कर्णधार आणि १०० हून अधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळण्याचा बहुमान. देशांतील अव्वल क्लबमधून खेळण्याचा अनुभव.

कल्याण चौबे यांचा आतापर्यंतचा प्रवास

बायचुंग भुतियाचे माजी सहकारी. त्यांच्या नावाचा गुजरात संघटनेचे सरचिटणीस मुलाराजसिंग चुडासामा यांच्याकडून प्रस्ताव. त्याला अरुणाचल प्रदेश फुटबॉल संघटनेचे सचिव किपा अजय यांच्याकडून मान्यता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com