Kapil Dev Angry Reaction | "तुम्ही त्याला ऑलराऊंडर म्हणूच कसं शकता?"; कपिल देव भडकले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Kapil-Dev-Angry

'टीम इंडिया'च्या स्टार खेळाडूवर संतापला विश्वविजेता कर्णधार

"तुम्ही त्याला ऑलराऊंडर म्हणूच कसं शकता?"; कपिल देव भडकले

sakal_logo
By
विराज भागवत

भारतीय संघ सध्या न्यूझीलंड विरूद्ध कसोटी मालिका खेळत आहे. त्याआधी भारत-न्यूझीलंड टी२० मालिका रंगली होती. त्या मालिकेसाठी नवोदित व्यंकटेश अय्यरला संधी देण्यात आली होती. टी२० विश्वचषक स्पर्धेत हार्दिक पांड्याला अष्टपैलू खेळाडू म्हणण्यासारखी साजेशी कामगिरी करता आली नव्हती. त्यामुळे न्यूझीलंड विरूद्धच्या टी२० मालिकेसाठी त्याला संघातून बाहेर करण्यात आले आणि व्यंकटेश अय्यरला संधी मिळाली. आता कसोटी मालिकेतही हार्दिकला संघात समाविष्ट करण्यात आलेल नाही. याचदरम्यान, भारताचे माजी कर्णधार कपिल देव यांनी रोखठोक मत व्यक्त केलं.

हेही वाचा: IND vs NZ: वासिम जाफरने स्वत:लाच केलं ट्रोल; जाणून घ्या कारण

"हार्दिक पांड्याला जर स्वत:ला अष्टपैलू खेळाडू म्हणवून घ्यायचं असेल तर त्याला फलंदाजी आणि गोलंदाजी अशा दोन्ही गोष्टी कराव्याच लागतील. सध्या तो गोलंदाजी करत नाही. त्यामुळे आपण त्याला अष्टपैलू म्हणता येऊ शकेल का? त्याला आधी गोलंदाजी करायला सुरूवात करू दे. कारण तो आताच दुखापतीतून बाहेर आला आहे. तो फलंदाज म्हणून टीम इंडियासाठी खूपच महत्त्वाचा खेळाडू आहे. पण गोलंदाज म्हणून पुन्हा ओळख मिळवण्यासाठी त्याला खूप सामने खेळावे लागतील. त्याने चांगली कामगिरी केली की त्यानंतर आपण काही बोलू शकतो", असं सडेतोड मत कपिल देव याने व्यक्त केलं.

Hardik-Pandya-Team-India

Hardik-Pandya-Team-India

हेही वाचा: "श्रेयस, तू ३०० रन्स केल्यास तरी तुला संघातून बाहेरच काढणार"

दरम्यान, भारतीय संघाचा नवोदित खेळाडू व्यंकटेश अय्यर हा सध्या हार्दिक पांड्याला अष्टपैलू म्हणून जोरदार टक्कर देत आहे. व्यंकटेश अय्यरने कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून IPL 2021 ला दमदार कामगिरी केली होती. त्यामुळे त्याला अनेकांची पसंती मिळाली. त्याचंच फळ म्हणून त्याला भारतीय संघात स्थान देण्यात आले होते.

loading image
go to top