IND Vs AUS Final : वर्ल्डकप फायनलसाठी न बोलवल्याने कपिल देव नाराज; म्हणाले, कधी कधी लोक...

Kapil Dev IPL 2023
Kapil Dev IPL 2023

IND Vs AUS Final : 1983 मध्ये पहिल्यांदा भारताला क्रिकेट विश्वचषक जिंकवून देणारे माजी कर्णधार आणि दिग्गज खेळाडू कपिल देव यांनी एक मोठं विधान केलं आहे. माजी वर्ल्डकप विजेत्यांना बीसीसीआयने अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर सन्मानित करण्यासाठी आमंत्रित केल्याची चर्चा अनेक दिवसांपासून सुरू होती.

मात्र, कपिल देव तेथे गेले नाहीत. याबद्दल जेव्हा कपिल देव यांना विचारण्यात आलं की, आज तुम्ही जाणार आहात अशी बरीच चर्चा झाली होती, मग तुम्ही का गेले नाहीत? तेव्हा कपिल देव यांनी एबीपी न्यूजशी बोलताना यावर भाष्य केलं.

कपिल देव यांच्या नेतृत्वाखालीच भारताला पहिल्यांदा विश्वचषकाची ट्रॉफी उंचवली होती. त्या साली 60 षटकांचा सामना झाला होता आणि फायनलमध्ये भारतासमोर वेस्ट इंडिजचा तगडा संघ भारतासमोर होता. आज भारतीय संघाला प्रथम फलंदाजीची संधी मिळाली आणि ऑस्ट्रेलियाला केवळ 241 धावांचे लक्ष्य देता आले. सामन्यात भारतीय फलंदाजांना कोणताही चमकदार कामगिरी दाखवता आली नाही.

भारतीय संघाने आपल्या क्रिकेट इतिहासात दोनदा आयसीसी एकदिवसीय विश्वचषक जिंकला आहे. पहिल्यांदा 1983 मध्ये, दुसऱ्यांदा 2011 मध्ये. 19 नोव्हेंबर रोजी यापूर्वी वर्ल्डकप जिंकलेल्या कर्णधारांना टीम इंडियाच्या प्रोत्साहनासाठी आमंत्रित केले जाईल अशी चर्चा होती.

Kapil Dev IPL 2023
Ind vs Aus Final : पॅलेस्टिनचा समर्थक घुसला मैदानात अन् सामना थांबला; फलंदाजी करणाऱ्या विराट कोहलीने...

विश्वचषक विजेता कर्णधार

क्लाइव्ह लॉईड (1975, 1979- वेस्ट इंडिज)

कपिल देव (1983 – भारत)

अॅलन बॉर्डर (1987 – ऑस्ट्रेलिया)

इम्रान खान (1992- पाकिस्तान)

अर्जुन रणतुंगा (1996 - श्रीलंका)

स्टीव्ह वॉ (1999 - ऑस्ट्रेलिया)

रिकी पाँटिंग (2003, 2007 - ऑस्ट्रेलिया)

एमएस धोनी (2011 - भारत)

मायकेल क्लार्क (2015 - ऑस्ट्रेलिया)

इऑन मॉर्गन (2019 - इंग्लंड).

भारत आणि ऑस्ट्रेलीया या अंतिम सामन्यात हे सर्व कर्णधार येतील अशी अपेक्षा होती. मात्र माजी कर्णधार कपिल देव यांच्या वक्तव्यावरून त्यांना सामना पाहण्यासाठी निमंत्रित करण्यात आले नसल्याचे स्पष्ट झाले आहे. कपिल देव यांनी एका खासगी वृत्तवाहिनीला याबद्दल माहिती दिली.

Kapil Dev IPL 2023
Ind vs Aus Final : जन गण मन...! दीड लाख लोकांनी एकाच वेळी गायले राष्ट्रगीत, पाहा अंगावर काटा आणणारा व्हिडिओ

कपिल देव काय म्हणाले?

दिग्गज खेळाडू कपिल देव यांनी दुखः व्यक्त केलं. ते कॅमेऱ्यासमोर म्हणाले की, तुम्ही मला फोन केला, मी इथे आलो. त्यांनी फोन केला नाही, मी गेलो नाही. हे सोपं आहे. माझी संपूर्ण 1983 विश्वचषक टीम तिथे असावी अशी माझी इच्छा होती. पण खूप काम चालू आहे. खूप जबाबदाऱ्या असतात, कधी कधी लोक विसरतात, असे कपिल देव म्हणाले. आज दुपारपासून कपिल देव यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com