

Kedar Jadhav Attends RSS Event
Esakal
भारताचा माजी क्रिकेटपटू केदार जाधव विजयादशमीच्या सोहळ्यानिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमात सहभागी झाला होता. २० ऑक्टोबरला पुण्यातील डेक्कन जिमखाना कॉलनीत आयोजित कार्यक्रमात त्याने संघाच्या पथसंचलनात भाग घेतला. यावेळी केदार जाधव संघाच्या गणवेशात दिसला. या कार्यक्रमाचे फोटोही त्याने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.