खाशाबा जाधव राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत कोल्हापूरला सर्वसाधारण विजेतेपद

कोल्हापूर जिल्हा कुस्ती संघाने खाशाबा जाधव राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेतील ग्रीको रोमन, फ्रीस्टाईल व महिला विभागात उल्लेखनीय कामगिरी करताना सर्वसाधारण विजेतेपदावर मोहोर उमटवली.
कोल्हापूरला सर्वसाधारण विजेतेपद
कोल्हापूरला सर्वसाधारण विजेतेपदSakal

उदगीर : कोल्हापूर जिल्हा कुस्ती संघाने खाशाबा जाधव राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेतील ग्रीको रोमन, फ्रीस्टाईल व महिला विभागात उल्लेखनीय कामगिरी करताना सर्वसाधारण विजेतेपदावर मोहोर उमटवली.

पुणे व सातारा या दोन्ही संघांनी उपविजेतेपदावर नाव कोरले. महाराष्ट्र राज्य शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या वतीने उदगीर येथील तालुका क्रीडा संकुलात ही स्पर्धा पार पडली.

ग्रीको रोमन प्रकारात कोल्हापूर जिल्हा संघाने निर्विवाद वर्चस्व गाजवताना १७२ गुणांसह विजेतेपदावर हक्क सांगितला. पुणे जिल्हा संघाला ९० गुणांसह उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले; तर सांगलीचा संघ तिसऱ्या स्थानावर राहिला.

फ्रीस्टाईल प्रकारात कोल्हापूर शहर संघाने सर्वाधिक १३५ गुणांसह प्रथम क्रमांक पटकावला. पुणे शहर संघाने १३० गुणांसह दुसरे स्थान पटकावले. कोल्हापूर जिल्हा संघाने १२० गुणांसह तिसरे स्थान मिळवले.

महिला गटात अपेक्षेप्रमाणे कोल्हापूर जिल्हा संघाने ११५ गुणांसह प्रथम क्रमांकावर झेप घेतली. सातारा संघाने १०५ गुणांसह दुसरा; तर सांगली संघाने १०५ गुणांसह तिसरा क्रमांक मिळवला.

या स्पर्धेत राज्यातील ३६० खेळाडूंनी पदकासाठी झुंज दिली. स्पर्धेसाठी लातूरकरांची गर्दी उसळली होती. स्पर्धेतील सुवर्ण, रौप्य व ब्राँझ पदकविजेत्यांना अनुक्रमे ६० हजार, ५० हजार व ३० हजार रुपयांच्या बक्षिसांनी गौरवण्यात आले.

सोनबाचा सोनेरी चौकार

कोल्हापूरच्या सोनबा गोंगाने याने खाशाबा जाधव राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदकाचा चौकार ठोकण्याचा पराक्रम केला. यंदाच्या ६५ किलो गटातील सुवर्णपदकाच्या लढतीत सोनबाने नाशिक जिल्ह्याच्या शुभम मोरेला १०-० गुणफरकाने लोळवून आपले नाणे पुन्हा एकदा खणखणीत वाजवून दाखवले. शुभमला रौप्यपदक मिळाले. या गटात पुणे शहरचा अभिजित शेळके व कोल्हापूरचा प्रतीक साळोखे ब्राँझपदकाचे मानकरी ठरले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com