IPL 2023: आयपीएल सुरू होण्यापूर्वीच CSKला झटका! दुखापतीमुळे हा खेळाडू संपूर्ण हंगामातून बाहेर

IPL 2023 पूर्वी आला मोठा अपडेट! एक कोटी रुपयाचा खेळाडू बाहेर
 kyle-jamieson-ruled-out-from-ipl-2023-due-to-back-stress-fracture-chennai-super-kings cricket news in marathi kgm00
kyle-jamieson-ruled-out-from-ipl-2023-due-to-back-stress-fracture-chennai-super-kings cricket news in marathi kgm00

IPL 2023 Chennai Super Kings : इंडियन प्रीमियर लीगच्या हंगामापूर्वी चेन्नई सुपर किंग्जला मोठा धक्का बसला आहे. चेन्नई सुपर किंग्जचा एक दिग्गज खेळाडू IPL 2023 मधून बाहेर पडला आहे. दुखापतीमुळे हा खेळाडू दीर्घकाळ क्रिकेटपासून दूर राहणार आहे.

 kyle-jamieson-ruled-out-from-ipl-2023-due-to-back-stress-fracture-chennai-super-kings cricket news in marathi kgm00
IND vs AUS: ऑस्ट्रेलियन संघाचा दुष्काळात तेरावा! दोन दिग्गज खेळाडू कसोटी मालिकेतून बाहेर

न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज काईल जेम्सनला पाठीवर शस्त्रक्रिया करावी लागणार आहे. त्यामुळे तो 9 महिन्यांहून अधिक काळ क्रिकेटपासून दूर आहे. आता तो आयपीएल 2023 मध्येही खेळू शकणार नाही. जून 2022 मध्ये शेवटची कसोटी खेळून इंग्लंडविरुद्धच्या सध्याच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत जेमिसनने पुनरागमन करणे अपेक्षित होते. मात्र, दुखापती आणि शस्त्रक्रियेची पुनरावृत्ती लक्षात घेता, त्याला पूर्ण तंदुरुस्ती मिळविण्यासाठी आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे.

 kyle-jamieson-ruled-out-from-ipl-2023-due-to-back-stress-fracture-chennai-super-kings cricket news in marathi kgm00
IND vs AUS: राहुलच्या राशीला प्रसादचं ग्रहण! सहा ट्वीट करत सांगितले 'या' तीन खेळाडूंवर होतोय अन्याय

न्यूझीलंडचे प्रशिक्षक गॅरी स्टीड यांनी 'सेन रेडिओ'ला सांगितले की, 'काईलसाठी हा एक आव्हानात्मक आणि कठीण काळ आहे. जेमीसनने यापूर्वी आशा व्यक्त केली होती की त्याची दुखापत विश्रांतीने बरी होईल, परंतु ती बरी झाल्यानंतर त्याला शस्त्रक्रियेचा पर्याय निवडणे भाग पडले. अनेक जागतिक दर्जाच्या खेळाडूंच्या पाठीवर शस्त्रक्रिया झाली आहे. त्यातून बरे होण्यासाठी वेळ लागतात.

31 मार्चपासून सुरू होणाऱ्या आयपीएल सीझनसाठी काइल जेम्सनला चेन्नई सुपर किंग्जने 1 कोटींमध्ये खरेदी केले. जेमसनने आतापर्यंत आयपीएलच्या 9 सामन्यात 9 विकेट घेतल्या आहेत. 2021 च्या मोसमात तो रॉयल चॅलेंजर्स बंगलोरसाठी खेळला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com