
अश्विनने चेन्नईतील आपल्या घरच्या मैदानावर 8 विकेट घेतल्या होत्या. याशिवाय त्याने शतकी खेळीही केली होती.
भारतीय संघाचा स्टार क्रिकेटर रविचंद्रन अश्विन आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या क्रमवारीत आघाडीच्या पाच खेळाडूंमध्ये पोहचला आहे. इंग्लंड विरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यातील अष्टपैलू खेळीचा त्याला मोठा फायदा झाला आहे. अश्विनने चेन्नईतील आपल्या घरच्या मैदानावर 8 विकेट घेतल्या होत्या. याशिवाय त्याने शतकी खेळीही केली होती. या कामगिरीच्या जोरावर त्याने आघाडीच्या पाच अष्टपैलू खेळाडूंमध्ये स्थान मिळवले आहे. ही आतापर्यंतची त्याची सर्वोच्च कामगिरी ठरली आहे. कर्णधार विराट कोहली फलंदाजांच्या यादीत पाचव्या स्थानावर कायम आहे.
भारतीय संघाने चेन्नईच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात 317 धावांनी विजय नोंदवला होता. बॅटिंग-बॉलिंगच्या दमदार कामगिरीच्या जोरावर सामनावीराचा पुरस्कार पटकावला होता. त्यानंतर त्याला आयसीसी क्रमवारीतही फायदा झालाय. अश्विनच्या नावे 336 गुण आहेत. या यादीत वेस्ट इंडिजचा जेसन होल्डर (407) रेटिंगसह अव्वलस्थानी आहे. रविंद्र जडेजा 403, इंग्लंडचा बेन स्टोक्स 397) आणि बांग्लादेशचा शाकिब अल हसन 352 गुणांसह पहिल्या चारमध्ये आहेत. या अष्टपैलूनंतर अश्विन पाचव्या स्थानावर आहे.
INDvsENG : जगातील सर्वांत मोठ्या मैदानावर रंगणाऱ्या कसोटीसाठी टीम इंडियाची घोषणा
indvseng,latest icc test ranking, r ashwin, Virat Kohli, all rounders rankings chennai 2nd test
R Ashwin is the new No.5 all-rounder in the latest @MRFWorldwide ICC Test Player Rankings
Full list: https://t.co/OMjjVx5Mgf pic.twitter.com/HWEyIRqovo
— ICC (@ICC) February 17, 2021
गोलंदाजांच्या क्रमवारीत 34 वर्षीय अश्विन 804 रेटिंगसह आठव्या स्थानावर आहे. त्याच्यानंतर जसप्रीत बुमराहचा नंबर लागतो. बुमराहला चेन्नईच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात विश्रांती देण्यात आली होती. पिंक बॉलवर पुन्हा तो भारतीय संघाच्या गोलंदाजाची धूरा सांभाळताना दिसेल. गोलंदाजांच्या यादीत ऑस्ट्रेलियाचा पॅट कमिन्स (908 रेटिंग प्वॉइंट्सह अव्वलस्थानी आहे.
फाफ डुप्लेसीची कसोटीमधून निवृत्ती; कारणही केलं स्पष्ट
चेन्नईच्या पहिल्या डावात शून्यावर बाद झालेला आणि दुसऱ्या डावात 62 धावांची खेळी करणाऱ्या विराट कोहलीच्या खात्यात 838 रेटिंग प्वॉइंट्स असून तो फलंदाजांच्या यादीत पाचव्या स्थानावर आहे. फलंदाजांमध्ये न्यूझीलंडचा केन विलियमसन (919 रेटिंग प्वॉइंट्स) आघाडीवर आहे. त्याच्यापाठोपाठ स्टीव्ह स्मिथ (891), मार्नस लाबुशेन (878) आणि ज्यो रुट (869) चौथ्या स्थानावर आहेत.