Diamond League Live Streaming: नीरज चोप्रासमोर पुन्हा एकदा श्रीलंकेच्या पाथिरागेचं आव्हान; कधी अन् कुठे पाहाणा मॅच?

Neeraj Chopra Faces Pathirage Challenge, Live Streaming Details: लुसाने डायमंड लीग आज खेळवली जाणार आहे. या स्पर्धेत पुनरागमन करण्यास नीरज चोप्रा सज्ज आहे. त्याच्यासमोर या स्पर्धेत राष्ट्रकुल स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या रुमेश पाथीरागेचे आव्हान असेल.
Javelin Match

Neeraj Chopra vs Rumesh Pathirage | Lausanne Diamond League

Sakal

Updated on

Lausanne Diamond League Live Streaming: दोन वेळा ऑलिंपिक पदक जिंकलेला नीरज चोप्रा डायमंड लीगमध्ये पुनरागमन करण्यास सज्ज आहे. लुसाने डायमंड लीग आज (२१ ऑगस्ट) पार पडणार आहे. यामध्ये भारताचा नीरज चोप्रा (Neeraj Chopra) आणि श्रीलंकेचा रुमेश पाथीरागे (Rumesh Pathirage) यांच्यामध्ये वर्चस्वाची लढाई पाहायला मिळणार आहे.

काही दिवसांपूर्वीच ग्लासगो राष्ट्रकुल स्पर्धेत हे दोघे आमने-सामने होते, तेव्हा पाथीरागे नीरजला वरचढ ठरला होता. त्यामुळे आता डायमंड लीगमध्ये भालाफेकीच्या लढतीकडे (javelin) अनेकांचे लक्ष असेल.

Javelin Match
Neeraj Chopra: नीरज समोर पुन्हा श्रीलंकेच्या पथिरागेचे आव्हान; राष्ट्रकुल स्पर्धेमधील पाच खेळाडूंचा लुसान डायमंड लीगमध्ये सहभाग
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com