The End of a Golden Era: नव्या पर्वाची पहाट! एका सुवर्णयुगाचा अस्त अन् फुटबॉलच्या नव्या ताऱ्यांचा उदय

FIFA World Cup 2026 emotional farewell: फिफा फुटबॉल वर्ल्ड कप २०२६ ही केवळ एका स्पर्धेची सांगता नव्हती, तर फुटबॉलच्या एका सुवर्णयुगाचा भावनिक शेवट होता. लिओनेल मेस्सी, ख्रिस्तियानो रोनाल्डो, नेयमार ज्युनियर, लुका मॉड्रीच यांसारख्या दिग्गजांनी विश्वचषकाला अखेरचा निरोप दिला.
Lionel Messi, Cristiano Ronaldo final World Cup appearance

Lionel Messi, Cristiano Ronaldo final World Cup appearance

esakal

Updated on

Lionel Messi, Cristiano Ronaldo final World Cup appearance : फिफा फुटबॉल वर्ल्ड कप २०२६ संपला... स्पेनने अंतिम सामन्यात अर्जेंटिनाच्या स्वप्नांचा चुराडा करताना १६ वर्षांनी जेतेपद पटकावले. फेरान टोरेसच्या एकमेव गोलने स्पेनला ऐतिहासिक विजय मिळवून दिला... जगातील सर्वोत्तम फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी ( Lionel Messi) ढसाढसा रडत मैदानाबाहेर गेला.. मेस्सीला असे पाहून स्टेडियममध्ये उपस्थित लहान चाहत्यांपासून ते वयोवृद्धांपर्यंतचे डोळे पाणावले...न्यू यॉर्क न्यू जर्सी स्टेडियममध्ये भावुक वातावरण पाहायला मिळाले... ३९ वर्षीय मेस्सीला आता पुन्हा वर्ल्ड कप खेळताना पाहता येणार नाही, या भावनेने आधीच मन बेचैन असताना त्याच्या हातात वर्ल्ड कपची ट्रॉफी न दिसणे, हे दुःख अस्सल मेस्सी फॅन्सनाच कळेल.. हा वर्ल्ड कप खऱ्या अर्थाने भावनिक होता... एका पिढीसाठी आदर्श असलेले बरेच खेळाडू या स्पर्धेनंतर निवृत्त झाले... मेस्सीचा कट्टर प्रतिस्पर्धी ख्रिस्तियानो रोनाल्डोही आता वर्ल्ड कप खेळणार नाही, क्रोएशियाचा स्टार ल्युका मॉड्रीच, ब्राझीलीयन स्टार नेयमार ज्युनियर आदी निवृत्त झाले.. पण, दुसरीकडे फुटबॉल विश्वाला किलियन एम्बाप्पे व लामिने यमाल हे भविष्यातील स्पर्धा गाजवणारे स्टारही मिळालेत...

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com