मुंबई क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष अजिंक्य नाईक यांनी केले लिओनल मेस्सीचे स्वागत..
esakal
मुंबईमध्ये रविवारी लियोनेल मेस्सीचा महिमा दिसून आला. तब्बल १४ वर्षांनंतर अर्जेंटिनाचा महान फुटबॉलपटू भारतात आला अन् समस्त देशवासीयांना पुन्हा एकदा ‘मेस्सीमय’ केले. कोणताही आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना नसताना मुंबईतील वानखेडे स्टेडियम प्रेक्षकांनी खचाखच भरलेले दिसले. निमित्त होते लियोनेल मेस्सीच्या उपस्थितीचे. याप्रसंगी संपूर्ण स्टेडियममध्ये लियोनेल मेस्सीच्या नावाचा ‘जयघोष’ होत होता. तो आला... त्याने पाहिले... अन् त्याने जिंकले... अशा शब्दांत लियोनेल मेस्सीच्या मुंबईतील दौऱ्याबाबत म्हणावे लागेल.