esakal | HBD माही: विशेष मुलाखतीसह धोनीसंदर्भातील काही भन्नाट बातम्या एका क्लिकवर...

बोलून बातमी शोधा

MSDhoni

पुन्हा मैदानात उतरावे आणि आपल्या फिनिशिंग अंदाजात भारतीय संघाला जिंकून द्यावे, असे त्याच्या तमाम चाहत्यांना आजही वाटते. सोशल मीडियावर उमटणाऱ्या बोलक्या प्रतिक्रियावरुन हेच दिसून येते.

HBD माही: विशेष मुलाखतीसह धोनीसंदर्भातील काही भन्नाट बातम्या एका क्लिकवर...
sakal_logo
By
टीम ई-सकाळ

पुणे : भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या 39 व्या वाढदिवसादिवशी सोशल मीडियावर धोनीमय वातावरण पाहायला मिळत आहे. इंग्लंडमध्ये रंगलेल्या विश्वचषकातील सेमीफायनलनंतर तो मैदानात दिसला नसला तरी त्याची क्रेज अजिबात कमी झालेली नाही. त्याने पुन्हा मैदानात उतरावे आणि आपल्या फिनिशिंग अंदाजात भारतीय संघाला जिंकून द्यावे, असे त्याच्या तमाम चाहत्यांना आजही वाटते. सोशल मीडियावर उमटणाऱ्या बोलक्या प्रतिक्रियावरुन हेच दिसून येते.

धोनीच्या वाढदिवसानिमित्त क्रिडा समीक्षक सुनंदन लेले यांनी सकाळसाठी दिलेल्या खास मुलाखतीमध्ये धोनीच्या प्रवासावर भाष्य केले. बदलत्या क्रिकेटच्या दुनियेत धोनीने संधीचं सोन कसं केल? यासह धोनीच्या बहरदार कारकिर्दीतील अविस्मरणीय किस्से सांगितले आहेत. या खास मुलाखतीसह धोनीसंदर्भातील खास बातम्या फक्त तुमच्यासाठी....