National Kabaddi : कडव्या संघर्षानंतर महाराष्ट्राचा विजय

पूर्वार्धातील कडव्या संघर्षानंतर महाराष्ट्रने गुजरातचा ४८-३१ असा पराभव करून आजपासून सुरू झालेल्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत विजयी सलामी दिली.
National Kabaddi
National Kabaddisakal

नगर : पूर्वार्धातील कडव्या संघर्षानंतर महाराष्ट्रने गुजरातचा ४८-३१ असा पराभव करून आजपासून सुरू झालेल्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत विजयी सलामी दिली. सामन्याच्या पहिल्याच चढाईत अस्लम इनामदारने बोनस गुण घेत संघाचे खाते उघडले; पण गुजरातने पहिला लोण महाराष्ट्रावर देत १३-९ अशी आघाडी घेतली. पूर्वार्धात अस्लम, आकाश व आदित्य या तिघांच्या अव्वल पकड झाल्याने महाराष्ट्रावर लोण देण्यात गुजरात यशस्वी झाले.

महाराष्ट्राने प्रतिकार करत २१-१९ अशी आघाडी घेतली. उत्तरार्धात झटपट लोण देण्याच्या प्रयत्नात अस्लमची पुन्हा दोन खेळाडूंत पकड झाल्याने २१-२१ अशी बरोबरी झाली; पण यानंतर मात्र महाराष्ट्राने गुजरातवर दोन लोण देत आघाडी घेतली. शेवटी १७ गुणांच्या फरकाने महाराष्ट्राने सामना जिंकला. आकाश शिंदे, आदित्य शिंदे यांच्या चढाया, तर मयूर कडमचा भक्कम बचाव यामुळे हे शक्य झाले. महाराष्ट्राने पूर्ण सामन्यात नऊ बोनस गुण मिळविले.

National Kabaddi
Dhoni CSK IPL 2024 : धोनीची अखेरची आयपीएल ?

गुजरातला अवघा एक बोनस गुण घेता आला. अ गटात भारतीय रेल्वेने बीएसएनएलचा ४०-७ असा धुव्वा उडविला. पहिल्या पाच मिनिटांत लोण देत रेल्वेने १०-० अशी आघाडी घेत आपला इरादा स्पष्ट केला. विश्रांतीला २४-१ अशी आघाडी रेल्वेकडे होती. त्यानंतर औपचारिकता पूर्ण करीत आपला विजय साकारला. पंकज मोहिते, मितू शर्मा, शुभम शिंदे यांच्या चतुरस्र खेळाला या विजयाचे श्रेय जाते. या सामन्यात रेल्वेने आठ, तर बीएसएनएलने तीन बोनस केले. अन्य सामन्यात क गटात गोव्याने बंगालचा ४६-१६ असे पराभूत केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com