esakal | महाराष्ट्र केसरी 2020 : विमानात बसलो ते पण थेट ग्रीससाठी... फक्त कुस्तीमुळे!
sakal

बोलून बातमी शोधा

Natha-Pawar

माणदेशी मुलखातील लिंगीवरे ते ग्रीसमधील अथेन्स हा प्रवास खूप मोठा होता. 

महाराष्ट्र केसरी 2020 : विमानात बसलो ते पण थेट ग्रीससाठी... फक्त कुस्तीमुळे!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

महाराष्ट्र केसरी 2020 : पुणे : आटपाडी तालुक्‍यातील लिंगीवरे गावचा नाथा पवार. माणदेशी मुलुखातील पैलवान. नंदीवाले या उपेक्षित समाजातील आहे. भूमीहीन कुटुंबातील हा पोरगा आहे. आईवडील शेतमजुरी करतात.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

त्याचे वडील लहू पवार पैलवान होते; पण आर्थिक परिस्थिती प्रतिकूल असल्याने लहूंना कुस्ती सोडावी लागली आणि घराकडे जावे लागले. आपण पैलवान होऊ शकलो नाही, याचे शल्य त्यांना होते. मग त्यांनी आपल्या पोराला पैलवान करण्याचे ठरवले. ज्या तालमीत ते शिकले होते त्याच तालमीत त्यांनी आपल्या पोराला ठेवले. 

- Breaking : इरफान पठाणची क्रिकेटमधून निवृत्ती

विजापूर-चिपळूण रोडवर असलेल्या बेणापूर गावात राजेंद्र शिंदे यांची तालीम आहे. अतिशय दुष्काळी भागातील ही तालीम. याच तालमीत लहू पवार यांचा नाथा कुस्तीचे धडे गिरवू लागला. त्याने राज्यातील कुस्त्या जिंकल्याच; पण तो ग्रीसमध्ये अथेन्स येथे झालेल्या कुस्ती स्पर्धेला गेला. तिथे जपानच्या मल्लासोबत तो लढला. माणदेशी मुलखातील लिंगीवरे ते ग्रीसमधील अथेन्स हा प्रवास खूप मोठा होता. 

- महाराष्ट्र केसरी 2020 : पंढरपूरच्या अटकळे बंधूंचा सुवर्णवेध!

'मी विमान खालून बघायचो. मला विमानात बसायला मिळेल, असे वाटत नव्हते; पण कुस्तीने संधी दिली,' असे तो भावनिक होऊन सांगतो. 

नाथाचा खेळ बघून उत्तम पाटणकर आणि सुहास शिंदे यांनी त्याला मानधन सुरू केले आहे. त्या मानधनावर आणि कुस्तीतल्या मिळणाऱ्या बक्षिसाच्या रकमेवर हा उपेक्षित समाजातील भूमिहीन पोरगा ऑलिंपिकला जायचय म्हणतोय.

- जितेंदर सुशीलचे दरवाजे बंद करणार?