महाराष्ट्र केसरीवर 'अवकाळी' बरसला; एलईडीची कमान कोसळली

Maharashtra Kesari Stop Due to Unseasonal Rain
Maharashtra Kesari Stop Due to Unseasonal Rain esakal

सकाळ वृत्तसेवा सातारा, ता. ८ : अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे महाराष्ट्र केसरी (Maharashtra Kesari) मैदानातील उपांत्य फेरीच्या लढती आज स्थगित करण्यात आल्या.

मैदानातील एलईडीची कमान कुस्तीसाठी तयार केलेल्या आखाड्यावर कोसळली. ती तत्परतेने दुरुस्त करण्यासाठी यंत्रणा कामालाही लागली.

पावसाचा जोर कमी झाल्यानंतर महाराष्ट्र केसरी स्पर्धा होईल, या आशेने आलेल्या प्रेक्षकांची घोर निराशा झाली. दरम्यान, उपांत्य फेरीतील सामने उद्या (ता. ९) सकाळी नऊ वाजता सुरू होतील, असे राज्य कुस्तीगीर परिषदेचे कार्याध्यक्ष नामदेवराव मोहिते यांनी सांगितले.

Maharashtra Kesari Stop Due to Unseasonal Rain
IPL 2022 : सायमंड - फ्रँकलिनने चहलचे हात - पाय बांधले अन्...

राज्य कुस्तीगीर परिषदेच्या मान्यतेने सातारा जिल्हा तालीम संघातर्फे जिल्हा क्रीडा संकुलात महाराष्ट्र केसरी मैदानाचे आयोजन केले आहे. आज उपांत्य लढतीचे सामने सायंकाळी सुरू होणार होते. मात्र, तत्पूर्वीच अचानक पावसाचे आगमन झाले. विजांच्या कडकडाटात पावसास सुरुवात झाली. संयोजकांच्या टीमने तत्परतेने प्लास्टिक कागद अंथरूण माती आखाडा भिजणार नाही, याची दक्षता घेतली. मात्र वाऱ्यामुळे कमान थेट आखाड्यावर कोसळली.

Maharashtra Kesari Stop Due to Unseasonal Rain
IPL : उथप्पाला धमकी देऊन मुंबई इंडियन्समधून आरसीबीत केलं होतं ट्रान्सफर

ती पूर्ववत उभी करण्यासाठी यंत्रणा कामाला लागली. याचवेळी पावसाचा जोर कमी झाल्याने पैलवानांचे प्रेक्षक संपला बाहेर जमले. संयोजकांकडून कुस्तीचे सामने रद्द करण्यात आल्याचा निर्णय पोलिसांकडून सांगण्यात आला. राज्य कुस्तीगीर परिषदेचे कार्याध्यक्ष श्री. मोहिते सव्वा सहाच्या सुमारास संकुलात आले. त्यांनी परिस्थितीची पाहणी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com