Maharashtra Kesari: महाराष्ट्र केसरी कुस्ती थरारक! मल्लांच्या जिद्द, ताकद आणि कौशल्याने मैदान दणाणलं; जखमी सिकंदर शेखचा आक्रमक खेळ

Maharashtra Kesari 2026: महाराष्ट्र केसरी स्पर्धेत गादी आणि माती विभागातील चुरशीच्या कुस्त्यांनी रंगत वाढवली आहे. यासाठी प्रेक्षकांची मोठी गर्दी जमली होती. तसेच मान्यवरांची उपस्थिती होती.
Maharashtra Kesari 2026

Maharashtra Kesari 2026

ESakal

Updated on

पुणे: रामकृष्ण अण्णा सातव पाटील आयोजित ६८ वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा अत्यंत रंजक आणि थरारक वातावरणात पार पडताना पाहायला मिळाली. स्पर्धेतील प्रत्येक लढतीत मल्लांनी जिद्द, ताकद आणि कौशल्याचा उत्कृष्ट संगम घडवून आणला. कुस्तीप्रेमी प्रेक्षकांनीही मोठ्या संख्येने उपस्थित राहून स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. मैदानावर उसळणारा जल्लोष, प्रत्येक डावावर उमटणाऱ्या टाळ्या आणि मल्लांना मिळणारे प्रोत्साहन यामुळे संपूर्ण वातावरण भारावून गेले होते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com