महाराष्ट्र केसरी निवड चाचणीची तारीख ठरली; पैलवानांना पाळावे लागणार कोरोना नियम

maharashtra kesari, wrestling, pune, rahatani, Rules and Guidelines, COVID 19
maharashtra kesari, wrestling, pune, rahatani, Rules and Guidelines, COVID 19

पिंपरी : कै. वस्ताद बाळासाहेब विठोबा गावडे प्रतिष्ठान आणि पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा कुस्तिगीर संघातर्फे आयोजित ‘महाराष्ट्र केसरी निवड चाचणी स्पर्धा’ मंगळवारी  होणार आहे, अशी माहिती राज्य कुस्तिगीर संघाचे उपाध्यक्ष आणि पिंपरी-चिंचवड कुस्तिगीर संघाचे कार्याध्यक्ष आमदार महेश लांडगे यांनी दिली. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर मार्गदर्शक तत्वानुसार या वर्षी प्रेक्षकांशिवाय स्पर्धा होईल.

निवडचाचणी कुस्ती स्पर्धेसाठी स्पर्धक पहिलवानांनी मंगळवारी 23 तारखेला सकाळी नऊ वाजता वजन तपासणीसाठी उपस्थित रहावे. येताना आधार कार्ड आणि वास्तव्याचा पुरावा सोबत आणावा. स्पर्धा दुपारी तीन वाजता, रहाटणी येथील ‘थोपटे लॉन्स’मध्ये होणार आहे. स्पर्धेत पैलवानांसोबत एक पालक उपस्थित राहू शकतील. यावेळी फक्त वरिष्ठ गटातील माती आणि गादी विभागातील स्पर्धा होतील. कुमार गटांतील स्पर्धेविषयी नंतर माहिती देण्यात येईल. 

वरिष्ठ गटासाठी माती आणि गादी विभागातील वजन गट 57, 61, 65, 70, 74, 79, 86, 92, 97 आणि 86 ते 125 (महाराष्ट्र केसरी गट) या प्रमाणे असतील. वस्ताद, मार्गदर्शक, पालक आणि स्पर्धकांनी वेळेत उपस्थित रहावे. ‘कोरोना’ विषयी सांगितलेल्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. स्पर्धा आयोजनात पिंपरी-चिंचवड कुस्तिगीर संघाचे सरचिटणीस संतोष माचूत्रे, खजिनदार दिलीप बालवडकर, भारत केसरी विजय गावडे, उपाध्यक्ष धोंडिबा लांडगे, विशाल कलाटे, काळुराम कवितके आदींचा सहभाग आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com