

Maharashtra in Khelo India University Games 2025
Sakal
खेलो इंडिया विद्यापीठ स्पर्धेतील पाचव्या पर्वात सलग दुसऱ्या दिवशी महाराष्ट्राच्या खेळाडूंनी पदकांची लयलूट केली. वेटलिफ्टिंगमधील ६५ किलो वजन गटात पुणे विद्यापीठाच्या संजय लोखंडेने सुवर्णपदकाचा करिश्मा घडविला. जलतरणात दीपक पाटील, साहिल पवार यांनी रूपेरी यशाला गवसणी घातली.