ICC Hall Of Fame : तीन दिग्गजांचा ICC कडून सन्मान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

jayawardene, shaun pollock and Janette Brittin
ICC Hall Of Fame : तीन दिग्गजांचा ICC कडून सन्मान

ICC Hall Of Fame : तीन दिग्गजांचा ICC कडून सन्मान

sakal_logo
By
सुशांत जाधव

आयसीसी हॉल ऑफ फेमच्या यादीत तीन नव्या दिग्गजांची वर्णी लागली आहे. श्रीलंकेचा माजी कर्णधार महेला जयवर्धने आणि दक्षिण आफ्रिकेचा माजी खेळाडू शॉन पोलाक यांना क्रिकेट जगतातील हा मानाचा सन्मान मिळाला आहे. या दोघांशिवाय जॅनेट ब्रिटिन यांच्या नावाचाही समावेश या यादीत करण्यात आला आहे. यापूर्वी 10 खेळाडूंच्या नावाची घोषणा झाली होती. ही यादी आता 13 दिग्गजांची झाली आहे.

कुमार संगकारा या यादीत सामील होणारा दहवा खेळाडू ठरला होता. त्याच्या पाठोपाठ आता महेला जयवर्धनेच्या नावाचा समावेश करण्यात आला आहे. 652 पेक्षा अधिक आंतरराष्ट्रीय सामन्यात जयवर्धनेनं कसोटी सामन्यात 11,814 धावा तर वनडेत 12,650 धावा केल्या आहेत. त्याने सर्व प्रकारात संघाचे नेतृत्व केले असून 2014 मध्ये टी20 वर्ल्ड कप विजेत्या संघाचा तो सदस्य राहिला आहे. जयवर्धनेनं या सन्मानानंतर आभारही मानले आहेत.

हेही वाचा: ...अन् हसन अलीची पत्नी माहेर घर असलेल्या भारतात परतण्याची पसरली अफवा

इंग्लंडचे सर्वात यशस्वी फलंदाज अशी ओळख असलेल्या जेनेट ब्रिटिन यांना मरणोत्तर हॉल ऑफ फेमच्या यादीत स्थान मिळाले आहे. त्यांची कारकिर्द ही 19 वर्षांची होती. 1992 मध्ये झालेल्या वर्ल्ड कप स्पर्धेतील अंतिम सामन्यात त्यांनी सर्वोच्च धावसंख्या केली होती. इंग्लंड संघातून निवृत्ती घेतल्यानंतर त्यांनी सरे संघाचे कोचिंगही केले होते.

हेही वाचा: भारतीय डॉक्टरने केला उपचार, रिझवानच्या रिकव्हरीची कहाणी थक्क करणारी

शॉन पोलाकने 108 कसोटीस 303 वनडे आणि 12 टी-20 सामन्यात दक्षिण आफ्रिकेचे प्रतिनिधीत्व केले आहे. 1995 मध्ये इंग्लंड विरुद्धच्या सामन्यातून पदार्पण करणाऱ्या पोलाकची कारकिर्द ही 13 वर्षांची होती.

loading image
go to top