
Khel Ratna Award Controversy Manu Bhaker statement : सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश व्ही रामासुब्रमणियम यांच्या अध्यक्षतेखालील १२ सदस्यीय निवड समितीने देशाच्या सर्वोच्च क्रीडा पुरस्कार मेजर ध्यान चंद खेल रत्नसाठी हॉकी संघाचा कर्णधार हरमनप्रीत सिंग आणि पॅरा खेळाडू प्रवीण कुमार यांच्या नावाची शिफारस केली आहे. या पुरस्कारासाठी नेमबाज मनू भाकरचे नाव नसल्याने सर्वांना आश्चर्य वाटले आहे. मनूचे वडील राम किशन यांनी तर संताप व्यक्त करताना मुलीला नेमबाज का बनवले असा सवाल स्वतःला केला आहे. त्यात आता राजकारणही तापू लागलं आहे आणि यावर मनू भाकरने मौन सोडले आहे.