IND vs PAK T20WC22 : मॅथ्यू हेडनच्या मुलीला भावला पाकिस्तानी खेळाडू? खांद्यावर डोकं टेकवून... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

matthew hayden daughter gracie

IND vs PAK T20WC22 : मॅथ्यू हेडनच्या मुलीला भावला पाकिस्तानी खेळाडू? खांद्यावर डोकं टेकवून...

Matthew Hayden Daughter Gracie : ऑस्ट्रेलियात होत असलेल्या टी 20 वर्ल्डकपमध्ये ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू मॅथ्यू हेडन पाकिस्तान संघाचा मेंटॉर म्हणून काम पाहत आहे. नुकताच पाकिस्तानने सुपर 12 मधील आपला पहिला सामना खेळला. या सामन्यात भारताने पाकिस्तानचा 4 विकेट्सनी पराभव केला. याचदरम्यान, पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहनवाझ दहानीचा एक फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या फोटोत पाकचा मेंटॉर मॅथ्यू हेडनची मुलगी ग्रेस देखील दिसत आहे.

हेही वाचा: AUS vs SL : Corona पाठ सोडत नाहीये! सामन्यापूर्वीच ऑस्ट्रेलियाचा स्टार खेळाडू आढळला पॉझिटिव्ह

व्हायरल होणाऱ्या फोटोत हेडनची मुलगी ग्रेस शहानवाजच्या खांद्यावर डोकं ठेवून बसलेली दिसते. या फोटोमुळे सोशल मीडियावर एका वेगळ्याच चर्चेला उकळी फुटली आहे. दहानी या फोटोत हेडनची मुलगी ग्रेस आणि मुलांसोबत दिसत आहे. हा फोटो भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यादरम्यानचा असल्याचा दावा देखील केला जात आहे.

हेही वाचा: Team India : रोहितचा मेसेज आला अन् टीम इंडियाची दिवाळी पार्टी झाली रद्द

शाहनवाझ दहानी पाकिस्तानच्या टी 20 वर्ल्डकप संघाचा भाग नाहीये. मात्र तो स्टँड बाय खेळाडू म्हणून संघासोबत ऑस्ट्रेलियात दाखल झाला आहे. पाकिस्तानने भारताविरूद्धच्या सामन्यात 20 षटकात 8 बाद 159 धावा केल्या होत्या. हे आव्हान पार करताना भारताची सुरूवात खराब झाली होती. मात्र विराट कोहली आणि हार्दिक पांड्याने पाचव्या विकेटसाठी 113 धावांची शतकी भागीदारी रचली. विराट कोहलीच्या 53 चेंडूत केलेल्या नाबाद 82 आणि हार्दिक पांड्याच्या 40 धावांचा जोरावर भारताने सामना शेवटच्या षटका पर्यंत नेला. शेवटच्या चेंडूवर अश्विनने चौकार मारत भारताला विजय मिळवून दिला.