AUS vs SL : Corona पाठ सोडत नाहीये! सामन्यापूर्वीच ऑस्ट्रेलियाचा स्टार खेळाडू आढळला पॉझिटिव्ह | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

T20 World Cup 2022 Australia Vs Sri Lanka Leg Spinner Adam Zampa Tested Corona Positive

AUS vs SL : Corona पाठ सोडत नाहीये! सामन्यापूर्वीच ऑस्ट्रेलियाचा स्टार खेळाडू आढळला पॉझिटिव्ह

Australia Vs Sri Lanka Adam Zampa Tested Corona Positive : टी 20 वर्ल्डकप 2022 मध्ये आज यजमान ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका याच्यात पर्थमध्ये लढत होत आहे. मात्र या लढतीपूर्वीच ऑस्ट्रेलियाला एक धक्का बसला. त्यांचा स्टार फिरकीपटू अॅडम झाम्पाला कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे तो या सामन्याला मुकला असून त्याची जागा अॅश्टोन अॅगरने घेतली आहे. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

हेही वाचा: Team India : रोहितचा मेसेज आला अन् टीम इंडियाची दिवाळी पार्टी झाली रद्द

अॅडम झाम्पाला फारशी गंभीर लक्षणं नाहीत. मात्र ऑस्ट्रेलियाने कोणताही धोका पत्करला नाही. आयसीसीच्या नव्या नियमानुसार जर एखादा खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला मात्र तो सामना खेळण्याच्या स्थितीत असेल तर त्याला रोखता येणार नाही. ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी 20 वर्ल्डकपची पात्रता फेरी नुकतीच पार पडली. या वेळी आयर्लंड आणि श्रीलंका यांच्यातील सामन्यात आयर्लंडच्या जॉर्ज डॉकरेल या कोरोनाची लागण झाली असतानाही तो मैदानावर उतरला होता.

हेही वाचा: Dinesh Karthik | VIDEO : दिनेश कार्तिकने अश्विनचे मानले आभार; म्हणाला काल...

दरम्यान, ऑस्ट्रेलियाला सुपर 12 च्या पहिल्याच सामन्यात न्यूझीलंडने पराभवाची धूळ चारली होती. त्यामुळे आजच्या सामन्यात यजमान ऑस्ट्रेलियाला दमदार पुनरागमन करावे लागेल. आज त्यांच्यासमोर श्रीलंकेचे तगडे आव्हान असणार आहे. जरी श्रीलंका पात्रता फेरी खेळून वर आली असली तरी त्यांनी काही आठवड्यांपूर्वी पाकिस्तानला मात देत आशिया कप जिंकला होता. ते गेल्या महिन्याभरापासून चांगलं क्रिकेट खेळत आहेत. सुपर 12 मधील ग्रुप 1 मध्ये ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, इंग्लंड, श्रीलंका, अफगाणिस्तान आणि आयर्लंड या सहा संघांचा समावेश आहे.