रोनाल्डो मेस्सी पहिल्या १०० मधून बाहेर, एम्बापेने पटकावला पहिला नंबर

अर्जेंटीना स्टार फुटबॉलर लियोनेल मेस्सी आणि पोर्तुगाचा दिग्गज खेळाडू प्लेअर क्रिस्टियानो रोनाल्डोला मोठा धक्का
messi and ronaldo
messi and ronaldoesakal
Updated on

अर्जेंटीना स्टार फुटबॉलर लियोनेल मेस्सी आणि पोर्तुगाचा दिग्गज खेळाडू प्लेअर क्रिस्टियानो रोनाल्डोला मोठा धक्का बसला आहे. या दोघांसह इंग्लंडचा कर्णधार हॅरी केनलाही झटका बसला आहे.

messi and ronaldo
ऑस्टेलियाला धक्का, वेगवान गोलंदाज जखमी तर दिग्गज खेळाडूची माघार

नुकतंच टॉप-100 मोस्ट व्हॅल्युएबल फुटबॉलर्सची यादी जाहिर करण्यात आली आहे. या 100 फुटबॉलपटूंच्या यादीत मेस्सी आणि रोनाल्डोच्या नावाचा उल्लेक नाही. तर हॅरी केन 30 व्या क्रमांकावर आहे. या यादीत फ्रान्सचा केलियन एमबाप्पे अव्वल स्थानावर आहे.

व्हिनिसियस ज्युनियर दुसऱ्या क्रमांकावर आहे

नुकतेच यूईएफए चॅम्पियन्स लीगच्या अंतिम फेरीत रिअल माद्रिदवर विजय मिळवणारा व्हिनिसियस ज्युनियर मोस्ट व्हॅल्युएबल फुटबॉलपटूंच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. 21 वर्षीय ब्राझीलच्या फुटबॉलपटूने फायनलमध्ये गोल केल्याने रियल माद्रिदने लिव्हरपूलला 1-0 ने पराभूत केले. विनिशियसचे मूल्य £158 दशलक्ष इतके आहे.

त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर इंग्लिश क्लब मॅनचेस्टर सिटीचा अर्लिंग हालंद आहे. त्याचे मूल्य अंदाजे £130 दशलक्ष आहे. यानंतर स्पॅनिश क्लब बार्सिलोनाची स्टारलेट पेद्री चौथ्या क्रमांकावर आहे. पाचवा क्रमांक बोरुसिया डॉर्टमंड क्लबच्या बेलिंगहॅमचा आहे.

messi and ronaldo
टीम इंडियामध्ये दिनेश कार्तिकचा रोल काय असेल? द्रविडने दिले उत्तर

नुकतचं मेस्सीने आंतरराष्ट्रीय मॅचमध्ये अर्जेंटीनाकडून खेळताना पहिल्यांदाच ५ गोल केल्या आहेत. स्पेनमध्ये खेळवण्यात आलेल्या स्पर्धेत एस्टोनियाविरुद्ध त्याने ही कामगिरी केली आहे. ही मॅच अर्जेंटीना ५-० ने जिंकली.

याचबरोबर लियोनल मेस्सी आंतरराष्ट्रीय मेन्स फुटबॉलमध्ये सर्वात अधिक गोल करणाऱ्या प्लेअर्सच्या लिस्टमध्ये चौथ्या स्थानावर आहे. त्याने आत्तापर्यंत ८६ गोल केल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Chhatrapati Shivaji Maharaj State Volleyball Tournament
Lionel Messi
Thailand Open
Sports News
Marathi News Esakal
www.esakal.com