Asian Games 2023 : भारतीय हॉकी संघाची गोल्डन कामगिरी, सुवर्ण पदकासह मिळवला पॅरिस ऑलिम्पिकचाही कोटा

Mens Hockey Team
Mens Hockey Team esakal

Asian Games 2023 : भारतीय पुरूष हॉकी संघाने जपानचा पराभव करत सुवर्ण पदक पटकावले. याचबरोबर भारताची सुवर्ण संख्या 22 वर पोहचली आहे. भारताने जपानचा 5 - 1 असा पराभव केला. या सुवर्ण कामगिरीबरोबरच भारताने पॅरिस ऑलिम्पिकचे तिकीटही फायनल केले.

भारताकडून कर्णधार हमरनप्रीत सिंगने 2 तर मनप्रीत सिंह, अमित रोहिदास, अभिषेक यांनी प्रत्येकी 1 गोल केला. जपानला संपूर्ण सामन्यात एकदाच भारताची गोलपोस्ट भेदण्यात यश आले. भारताचे यंदाच्या एशियन गेम्समधील हे 22 वे सुवर्ण पदक आहे. या पदकाबरोबरच भारताची सध्याची पदकसंख्या ही 92 वर पोहचली आहे.

Mens Hockey Team
World Cup 2023 : वर्ल्ड कपच्या सेमिफायनलमध्ये कोणते संघ असतील, सचिन तेंडुलकरनं कुणाचे घेतले नाव?

भारत आणि जपान यांच्यातील पुरूष हॉकी अंतिम सामन्यात पहिले क्वार्टर हे गोल शून्य बरोबरीत राहिले. दोन्ही संघाला प्रतिस्पर्ध्यांचा गोलपोस्ट भेदण्यात अपयश आले. मात्र दुसऱ्या क्वार्टरमध्ये भारताच्या मनप्रीत सिंगने 25 व्या मिनिटाला भारताचे गोलचे खाते उघडले. यानंतर भारताने हाफ टाईमपर्यंत 1 - 0 अशी आघाडी घेतली.

यानंतर तिसऱ्या क्वार्टरमध्ये भारताने आपली आघाडी वाढवली. कर्णधार हरमनप्रीत सिंगने 32 व्या मिनिटाला पेनाल्टी कॉर्नरवर भारताचा दुसरा गोल केला. पाठोपाठ अमित रोहिदासने 36 व्या मिनिटाला मैदानी गोल करत भारताची आघाडी 3 - 0 अशी वाढवली. तिसऱ्या क्वार्टरपर्यंत भारतीय संघाने आपली आघाडी 3 - 0 अशी कायम ठेवली होती.

Mens Hockey Team
World Cup 2023 : 'सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्डाकडे स्टेडियममधील खुर्च्या साफ करण्याचे देखील नाहीत पैसे'

पहिल्या तीन क्वार्टरमध्ये जपानला भारतीय गोलपोस्ट भेदण्यात अपयश आले. चौथ्या आणि शेवटच्या क्वार्टरमध्ये देखील भारताने आपले वर्चस्व कायम ठेवले. 48 व्या मिनिटाला भारताच्या अभिषेकने भारताचा चौथा गोल केला. यानंतर अखेर 51 व्या मिनिटाला जपानने सामन्यातील पहिला गोल केला. तनाका सरेनने पेनाल्टी कॉर्नरवर गोल केला.

मात्र भारताचा कर्णधार हरमनप्रीत सिंहने 59 व्या मिनिटाला आपला दुसरा आणि संघाचा पाचवा गोल करत भारताला सुवर्ण पदक मिळवून दिले. याचबरोबर भारताने पॅरिस ऑलिम्पिकचा कोटा देखील मिळवला.

(Sports Latest News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com