Matthew Hayden : ...म्हणून पाकिस्तानला घाबरायला पाहिजे; फायनल गाठल्यानंतर मेंटॉर हेडनची गर्जना | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mentor Matthew Hayden Reaction After Pakistan Reached In Final

Matthew Hayden : ...म्हणून पाकिस्तानला घाबरायला पाहिजे; फायनल गाठल्यानंतर मेंटॉर हेडनची गर्जना

Mentor Matthew Hayden Reaction : पाकिस्तानने न्यूझीलंडचा 7 विकेट्स राखून पारभव करत टी 20 वर्ल्डकप 2022 ची फायनल गाठली. नेदरलँडच्या दमदार कामगिरीच्या जोरावर सुपर 12 मधून अंतिम फेरी गाठणाऱ्या पाकिस्तानने अंतिम फेरी गाठल्यानंतर संघातील खेळाडू आणि प्रशिक्षक स्टाफने एकच जल्लोष केला. दरम्यान, ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी 20 वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानचा मेंटॉर असलेला ऑस्ट्रेलियाचाच माजी खेळाडू मॅथ्यू हेडन काम पाहत आहे. त्याने देखील पाकिस्तान फालनलमध्ये पोहचल्यानंतर आपली प्रतिक्रिया दिली.

हेही वाचा: New Zealand : न्यूझीलंड नवीन चोकर्स! गतविजेत्यांना लोळवले मात्र पाककडून पराभव

पाकिस्तानच्या विजयानंतर भारावून गेलेला मेंटॉर मॅथ्यू हेडन म्हणाला की, 'आजची रात्र खूप खास आहे. आमच्या वेगवान गोलंदाजांनी अविश्वसनीय कामगिरी केली. मला असे वाटते की आम्ही पूर्ण क्षमतेने आमचा खेळ केला नाही. मात्र जे आमच्यासोबत फायनल खेळतील त्यांच्यासाठी हीच भीतीदायक गोष्ट आहे. मेलबर्नमधली विकेट चांगली असेल.'

हेही वाचा: PAK vs NZ : पुन्हा हाईट नो बॉलचा गोंधळ! विराटप्रमाणे मात्र रिझवानला....

पाकिस्तानच्या विजयाचा पाया रचणाऱ्या बाबर आणि रिझवानबाबत हेडन म्हणाला की, 'तुम्ही गुणवत्तेला हरवू शकत नाही. बाबर आणि रिझवान हे गेल्या अनेक वर्षापासून करत आहेत. मोहम्मद हारिस हा नेटमध्ये सगळ्या गोलंदाजांना चोपत होता. गोलंदाजांना या खेळपट्टीवर जुळवून घेत संथ गतीने गोलंदाजी करावी लागली. त्यांनी चांगल्या प्रकारे गोलंदाजी केली. हारिस रौऊफ तर सातत्याने 150 किमी प्रती तास वेगाने गोलंदाजी करत आहे. पाकिस्तानचा दिवस असेल तर त्यांना कोणीही रोखू शकत नाही. शादाब हा झुंजार खेळाडू आहे. तुम्हाला कोणतीही स्पर्धा जिंकायची असेल तर तुम्हाला चांगली लढत द्यावी लागते. अंतिम सामना भव्य होण्यासाठी पाकिस्तानचा अंतिम सामना भारतासोबत व्हावा.'

उद्या 10 नोव्हेंबरला अॅडलेडवर टी 20 वर्ल्डकपमधील दुसरा सेमी फायनल सामना भारत आणि इंग्लंड यांच्यात होत आहे. भारतासाठी ही तुल्यबळ लढत असणार आहे.