FIFA World Cup: मेस्सीने ज्याला अंगाखांद्यावर खेळवले, तोच विरोधात उभा राहणार! Final मध्ये आश्चर्याची गोष्ट दिसणार

Messi Lamine Yamal Baby Photo: फिफा वर्ल्ड कप २०२६ अंतिम सामना १९ जुलैच्या रात्री स्पेन विरुद्ध अर्जेंटिना असा होणार आहे. या पार्श्वभूमीवर मेस्सी आणि एका लहान बाळाचा फोटो जोरदार व्हायरल होत आहे. यामागचं कारण जाणून घ्या.
Messi Lamine Yamal Baby Photo | FIFA World Cup 2026 | England vs France.

Messi Lamine Yamal Baby Photo | FIFA World Cup 2026

Sakal

Updated on

FIFA World Cup 2026 Final: फिफा वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेतील अंतिम संघ निश्चित झाले आहेत. स्पेनने फ्रान्सला हरवून १६ वर्षांनी अंतिम फेरीत धडक मारली आहे, तर अर्जेटिंनानेही इंग्लंडला हरवून सलग दुसऱ्यांदा अंतिम फेरी गाठली आहे. त्यामुळे आता स्पेन विरुद्ध अर्जेंटिना संघात १९ जुलैच्या रात्री अंतिम सामना खेळवला जाणार आहे.

या सामन्यानंतर फिफा वर्ल्ड कप २०२६ चा विजेता संघ मिळेल. दरम्यान, स्पेन आणि अर्जेंटिना या संघांनी अंतिम फेरी गाठताच एक फोटो प्रचंड चर्चेत आला आणि योगायोग म्हणजे नेमकं काय, याचा प्रत्येय सर्वांनाच आला आहे.

Messi Lamine Yamal Baby Photo | FIFA World Cup 2026 | England vs France.
Fifa World Cup Semi Final: फ्रान्स अन् एम्बाप्पेची मक्तेदारी संपुष्टात! स्पेनची बाचवभींत ओलांडण्यात अपयशी, 'Tiki-Taka' ने कमाल दाखवली
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com