

Crores for Messi but No Support for Indian Football Captain Reacts
Esakal
अर्जेंटिनाचा फुटबॉलपटू लियोनेल मेस्सी नुकताच भारत दौऱ्यावर आला होता. त्याच्या GOAT टूरची जगभरात चर्चा झाली. या टूरमध्ये मेस्सी कोलकाता, हैदराबाद, मुंबई आणि दिल्लीतील कार्यक्रमांमध्ये सहभागी झाला. मेस्सीला पाहण्यासाठी चाहत्यांनी हजारो रुपये खर्च करून तिकीट काढले होते. दरम्यान, आता भारतीय फूटबॉल संघाचा कर्णधार संदेश झिंगनने भारतीय फुटबॉललच्या अवस्थेवरून टीका केलीय. झिंगनने इन्स्टाग्रामवर म्हटलं की, भारतीय फुटबॉलप्रेमींनी देशातल्या फुटबॉलकडेसुद्धा बघावं. देशात बदल करण्यासाठी प्रयत्न करावा. यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर आणि इंडियन सुपर लीगसह देशातील इतर महत्त्वाच्या लीगकडे लोकांचं लक्ष वळेल.