Women's World Cup: मिताली राज इतिहास रचण्याच्या उंबरठ्यावर

Mithali Raj Equals most Half Century in Women's World Cup
Mithali Raj Equals most Half Century in Women's World Cup esakal

ऑकलँड: भारतीय महिला संघाची कर्णधार मिताली राजने (Mithali Raj) आजच्या ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या सामन्यात दमदार अर्धतक ठोकले. तिने 96 धावात 68 धावांची अर्धशतकी खेळी केली. मात्र ऑस्ट्रेलियाने भारताचे 278 धावांचे आव्हान चार फलंदाजांच्या मोबदल्यात पार करत ही अर्धशतकी खेळी व्यर्थ घालवली. भारताने ऑस्ट्रेलिया (India Women vs Australia Women) विरूद्धचा सामना 6 विकेट्सनी हरला. असे असले तरी या सामन्यात कर्णधार मिताली राजने एक माईल स्टोनची बरोबरी केली.

Mithali Raj Equals most Half Century in Women's World Cup
दिवस फिरतात; भारताकडून 2 वर्ल्डकप खेळलेला खेळाडू झाला गुजरातचा नेट बॉल

मिताली राजची ऑस्ट्रेलियाविरूद्धची आजची खेळी ऐतिहासिक ठरली. तिचे हे वर्ल्डकपमधील 12 वे अर्धशतक होते. तर वनडे कारकिर्दितील तिचे हे 63 वे अर्धशतक होते. या अर्धशतकाबरोबर मिताली राजने न्यूझीलंडच्या डेब्बी हॉक्लेच्या (Debbie Hockley) वर्ल्ड रेकॉर्डशी (World Record) बरोबरी केली. हॉक्लेने वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक अर्धशतके ठोकली आहेत. आता मिताली राजने या वर्ल्ड रेकॉर्डची बरोबरी केली असून भारताचे साखळी फेरीतील अजून दोन सामने शिल्लक आहेत. त्यामुळे मिताली राजला डेब्बीचे वर्ल्ड रेकॉर्ड मोडण्याची चांगली संधी आहे.

Mithali Raj Equals most Half Century in Women's World Cup
Asia Cup 2022 : श्रीलंकेला मिळाले यजमानपद; तारखा जाहीर

ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या सामन्यात भारताने दमदार फलंदाजी करत 50 षटकात 7 बाद 277 धावांपर्यंत मजल मारली होती. भारताकडून मिताली राजने 69 चेंडूत 68 धावा केल्या होत्या तर यस्तिका भाटियाने 59 धावांची खेळी केली. यानंतर स्लॉग ओव्हरमध्ये हरमनप्रीत कौरने फटकेबाजी करत 57 धावांची खेळी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com