Mohammed Shami : 'लाज वाटते मित्रा...' पाकिस्तानी खेळाडूवर भडकला मोहम्मद शमी, जाणून घ्या काय आहे प्रकरण

मोहम्मद शमीने हसन रझावर फटकारले: 'लाज वाटते मित्रा...'
Mohammed Shami on Hasan Raza
Mohammed Shami on Hasan RazaEsakal

Mohammed Shami on Hasan Raza :

टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज 2023 च्या वर्ल्ड कप स्पर्धेत धुमाकूळ घालत आहेत. विशेषत: मोहम्मद शमीची संघात एन्ट्री झाल्यापासून संघाचा दृष्टिकोन वेगळा दिसून आला.

दरम्यान, मोहम्मद शमीने पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूला फटकारले आहे. खरं तर माजी पाकिस्तानी क्रिकेटपटूने बीसीसीआय किंवा आयसीसीवर आरोप केला होता की ते भारतीय गोलंदाजांना वेगवेगळे चेंडू देतात, त्यामुळे चेंडू अधिक स्विंग होतो. यावर मोहम्मद शमीने सोशल मीडियावर पोस्ट टाकून जोरदार टीका केली आहे.

Mohammed Shami on Hasan Raza
World Cup 2023 Semi Final Equation : उपांत्य फेरीचे संपूर्ण समीकरण स्पष्ट! 3 संघांमध्ये एका जागेसाठी लढत, 4 संघ बाहेर...

एका शोदरम्यान माजी पाकिस्तानी क्रिकेटर हसन रझा म्हणाला की, 'ज्या प्रकारे सिराज आणि शमी बॉल स्विंग करत होते. त्यावरून असे वाटत आहे की, दुसऱ्या डावात त्यांना आयसीसी आणि बीसीसीआयकडून बॉलचा वेगळा सेट दिला जात आहे. चेंडू अधिक स्विंग करण्यासाठी त्यावर कोटिंगचा अतिरिक्त थर असू शकतो. यावर प्रतिक्रिया देताना मोहम्मद शमीने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक स्टोरी पोस्ट केली आहे.

टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने सोशल मीडियावरून ही पोस्ट केली आहे. तो म्हणाला, शमीने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक स्टोरी शेअर केली ज्यामध्ये त्याने लिहिले, 'मित्रा, लाज वाटते, खेळावर लक्ष केंद्रित कर आणि अनावश्यक मूर्खपणावर नाही. इतरांच्या यशाचा कधीतरी आनंद घ्या. शिट यार, हा आयसीसी वर्ल्ड कप आहे, कोणतीही स्थानिक स्पर्धा नाही आणि तुम्ही एक खेळाडू होता, बरोबर? वसीम भाईंनी स्पष्ट केले होते, तरीही. तुमचा खेळाडू वसीम अक्रमवर विश्वास नाही. रझा यांच्या या वक्तव्यावर पाकिस्तानचा माजी कर्णधार वसीम अक्रमने आधीच प्रतिक्रिया दिली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com