MS Dhoni IND Vs RSA : आफ्रिकेविरूद्ध धावांचा पाऊस! धोनीनं पांड्या - पंतला दिली खास टिप्स | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

MS Dhoni Give Tips To Hardik Pandya Rishabh Pant

MS Dhoni IND Vs RSA : आफ्रिकेविरूद्ध धावांचा पाऊस! धोनीनं पांड्या - पंतला दिली खास टिप्स

India Vs South Africa : भारताने ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी 20 वर्ल्डकप 2022 चे सुपर 12 मधील आपले पहिले दोन्ही सामने जिंकले आहेत. भारताने पाकिस्तानचा अवघड पेपर पहिल्यांदाच सोडून डोक्यावरचं मोठं ओझं कमी केलं. तर नेदरलँडविरूद्ध सफाईदारपरणे विजय मिळवत आणखी दोन गुणांची कमाई केली. दरम्यान, नेदरलँडविरूद्धच्या सामन्यात भारताच्या मधल्या फळीला फलंदाजी करण्याची संधी मिळाली नाही. हार्दिक पांड्याने पाकिस्तानविरूद्ध 40 धावांची खेळी केली होती. मात्र तरी देखील सामना फिनिश करण्यात तो कमी पडला होता. आता भारताचा अव्वल मॅच फिनिशन आणि माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने हार्दिक पांड्या आणि त्याच्या बरोबरच ऋषभ पंतला देखील मोलाचा सल्ला दिला आहे.

हेही वाचा: Glenn Phillips : न्यूझीलंडच्या फिलिप्सने 'मंकडिंग' चुकवण्यासाठी लढवली भन्नाट शक्कल; VIDEO व्हायरल

माध्यमांच्या काही रिपोर्ट्सनुसार महेंद्रसिंह धोनीने या पंत आणि पांड्याला त्यांच्या बॅटबाबत एक खास सल्ला दिला आहे. टी 20 क्रिकेट हे दिवसेंदिवस प्रगल्भ होत चालले आहे. टी 20 क्रिकेटमध्ये षटकार आणि चौकारांना फार महत्व असते. त्यामुळे बॅटच्या आकाराला ही महत्व प्राप्त झाले आहे. काही माध्यमातील रिपोर्टनुसार धोनीने हार्दिक पांड्या आणि ऋषभ पंतला कर्व्ह बॅटने खेळण्याचा सल्ला दिला आहे.

याबाबत एसजी (SG) चे कार्यकारी संचालक पारस आनंद यांनी टाईम्स ऑफ इडियाला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते की, सर्वात प्रथम महेंद्रसिंह धोनीने 2019 च्या वर्ल्डकपपूर्वी कर्व्ह बॅटचा (Curved Bat) वापर करण्यास सुरूवात केली होती. आता हार्दिक पांड्या आणि ऋषभ पंतने देखील अशाच प्रकारच्या बॅटची मागणी केली आहे.

हेही वाचा: NZ vs SL : आशियाई शेर न्यूझीलंडपुढे ढेर! ग्रुप 1 मध्ये किवी अव्वल तर लंका पाचव्या स्थानावर

मिळालेल्या माहितीनुसार हार्दिक पांड्या आणि ऋषभ पंतला त्यांचा मेंटॉर धोनीने कर्व्ह बॅट वापरण्याचा सल्ला दिला आहे. हार्दिक पांड्याने आयपीएल 2022 पूर्वी चार महिने आपल्या बॅटच्या आकारावर देखील काम केले. ऋषभ पंत सध्या टी 20 संघात आत बाहेर करत आहे. टी 20 मध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करण्यासाठी पंतने धोनीकडे मदत मागितली आहे. दरम्यान, SG चे एमडी आनंद यांनी सांगितले की ही विशिष्ट प्रकारची बॅट फक्त टी 20 साठीच ऑर्डर केली जात आहे. खेळाडूंच्या मते या बॅटने मैदानाच्या कोणत्याही कोपऱ्यात सहजतेने मोठे फटके मारता येतात.