IPL च्या महाकुंभातून बाहेर पडताच MS Dhoni निवडणुकीच्या रणसंग्रामात| ms dhoni in jharkhand panchayat election duty | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

MS Dhoni
IPL च्या महाकुंभातून बाहेर पडताच MS Dhoni निवडणुकीच्या रणसंग्रामात

IPL च्या महाकुंभातून बाहेर पडताच MS Dhoni निवडणुकीच्या रणसंग्रामात

गतवर्षी चॅम्पीयन ठरलेली चेन्नई सुपर किंग्ज यंदाच्या १५ व्या सीझनमध्ये प्ले ऑफ स्पर्धेतून बाहेर पडली. पॉईंट टेबलमध्ये चेन्नईचा संघ ९ व्या स्थानावर आहे. दरम्यान, आयपीएलच्या महाकुंभातून बाहेर पडताच चेन्नईचा थाला म्हणजेच कर्णधार एम एस धोनी निवडणुकीच्या रिंगणात उतरला असल्याचे पाहायला मिळाले.

माही मुळचा रांचीचा आहे. सध्या झारखंडमध्ये पंचायत समितीची निवडणुक सुरु आहे. अशातच तेथे इलेक्शन ड्यूटीमध्ये धोनी दिसला. त्यामुळे तो निवडणुकीच्या रिंगणात उतरला असल्याची चर्चा क्रिकेट जगतात रंगली आहे. धोनीचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

हेही वाचा: IPL प्लेऑफसाठी ईडन गार्डन्स सज्ज; गुजरात-राजस्थानमध्ये सामना

नेमकं सत्य काय?

सोशल मीडियावर एक फोटो सध्या व्हायरल होताना दिसत आहे. हा फोटो झारखंड पंचायत निवडणुकीतील आहे. रांची येथे इलेक्शन ड्यूटीमध्ये महेंद्र सिंह धोनीसारखा एक व्यक्ती पाहायला मिळाला. त्याला पाहून सर्वांना धोनी इलेक्शन ड्यूटी करत आहे असं वाटलं. पण तो धोनी नाही कोणी दुसराच व्यक्ती आहे.

त्या व्यक्तीचे नाव विवेक कुमार असे आहे. सीसीएलच्या एका डिपार्टमेंटचे असिस्टंट मॅनेजर आहे. ते इलेक्शन ड्यूटीमध्ये मतमोजणी करत आहेत.

विवेक कुमार यांचा चेहरा एम एस धोनीच्या चेहऱ्याशी मिळताजुळता आहे. त्यामुळे लोक पुर्ण फसले की तो माहीच आहे. त्यामुळे सोशल मीडियावर धोनीसंदर्भात एक वेगळीच चर्चा सुरु झाली आहे. अनेक तर्कवितर्क लावण्यात येत आहेत.

हेही वाचा: नीरज चोप्राच्या ट्विटवर झरीनचे उत्तर व्हायरल; इस्तंबूलमध्ये झेंडा फडकवूनच ...

IPL 2023 माही खेळणार

चेन्नईने अखेरची मॅच राजस्थानविरुद्ध खेळली होती. या मॅचमध्ये धोनीने आयपीएल भविष्याबाबत भाष्य केलं होते. आयपीएलचे १५ वे सीझन हे अखेरची आयपीएल नसुन पुढच्या हंगामातदेखील धोनी खेळताना दिसणार आहे. असा खुलासा धोनीने स्वतः केला आहे.

एमएस धोनीसाठी आयपीएल 2022 खूप चांगले ठरले. या मोसमात संघाने काही खास कामगिरी केली नसली तरी एमएस धोनीने अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत. या मोसमात एमएस धोनीने 14 सामन्यात 33.14 च्या सरासरीने 232 धावा केल्या. त्यामध्ये एख अर्धशतकही झळकावले आहे. महेंद्रसिंग धोनी पुढील हंगामात चेन्नई सुपर किंग्जचे नेतृत्व करताना दिसणार आहे.

Web Title: Ms Dhoni In Jharkhand Panchayat Election Duty

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top