'पडोसन'ला इम्प्रेस करण्यासाठी विराट घेतोय धोनीचा सल्ला; पाहा व्हिडिओ!

टीम ई-सकाळ
Monday, 18 January 2021

हा व्हिडिओ जेव्हा तुम्ही पाहाल तेव्हा तुम्हीदेखील पोट धरून हसाल.

पुणे : टीम इंडिया वनडे संघाचा कॅप्टन विराट कोहली (Virat Kohli) आणि भारताला आयसीसीची सर्व जेतेपदे मिळवून देणारा कॅप्टन कूल एम.एस. धोनी (MS Dhoni) यांचा एक व्हिडिओ सध्या इंटरनेटवर खूप व्हायरल होत आहे. ज्यामध्ये विराट कोहली आणि एमएस धोनी सुपरहिट बॉलिवूड गाणे गाताना दिसत आहेत. कोहली आणि धोनी यांचा हा व्हिडिओ इडिट करण्यात आलेला असून तो सध्या सोशल मीडियात धुमाकूळ घालत आहे. 

प्रसिद्ध गायक किशोरकुमार आणि ज्येष्ठ अभिनेते सुनील दत्त यांचं पडोसन चित्रपटातील 'मेरे सामने वाली खिडकी मे एक चांद का टुकडा रहता है' हे गाणं तर सगळ्यांना माहित आहे. याच गाण्यावर धोनी आणि कोहली यांनी ताल धरल्याचे दाखविण्यात आले आहे. किशोर कुमार यांच्या भूमिकेत आहे धोनी, तर सुनील दत्त यांच्याजागी विराटची वर्णी लागली आहे. 

पहिले ऑलिंपिकवीर खाशाबा जाधव पद्मविभूषणपासून उपेक्षितच!​

हा व्हिडिओ जेव्हा तुम्ही पाहाल तेव्हा तुम्हीदेखील पोट धरून हसाल. जो कोणी हा व्हिडिओ पाहत आहे, त्याच्या तोंडून हेच ऐकू येत आहे ते म्हणजे, 'ज्यानं कुणी हे बनवलंय त्यानं कमाल बनवलंय. भावा एक नंबर, व्हिडिओ इडिटरला एखादा पुरस्कार देऊन टाका,' असंही काही जणांचं म्हणणं आहे. 

पहिलं 'कन्या' रत्न लाभलेली, क्रिकेटमधली 'बाप' माणसं!​

दरम्यान, गेल्या आठवड्यात विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा या दाम्पत्याला मुलगी झाली. विरुष्का आणि दोघांच्या चाहत्यांनीही आनंद साजरा केला. त्यानंतर आता विराट आणि धोनीच्या या व्हिडिओमुळे त्यांचे चाहते कमालीचे आनंदी झाले आहेत. या व्हिडिओला खूप लोकप्रियता मिळत आहे.

James Naismith Google Doodle आजच्या दिवशी बास्केटबॉलचा लागला हाेता शाेध, जाणून घ्या त्यामागची कथा​

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by ShareChat (@sharechatapp)

- क्रीडा क्षेत्रातील आणखी बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam) 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MS Dhoni Virat Kohli Kishore Kumar Sunil Dutt Mere samane wali Khidki video viral