पहिलं 'कन्या' रत्न लाभलेली, क्रिकेटमधली 'बाप' माणसं!

Virushka
Virushka

टीम इंडियाची रनमशिन कॅप्टन विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा या दाम्पत्याला ११ जानेवारीला कन्यारत्न झाले. मुलगी जन्मल्याचा आनंद विराटसह त्याच्या चाहत्यांनी उत्साहात साजरा केला. अनुष्का आणि विराट आई-बाबा झाल्याने बॉलिवूडसह क्रिकेटविश्वातील सर्वांनीच त्यांचे अभिनंदन केले. अनुष्का आणि विराटचे ११ डिसेंबर २०१७मध्ये लग्न झाले होते. 

किंग कोहली बापमाणूस झाल्याने त्याचा समावेश आता स्पेशल ग्रुपमध्ये झाला आहे. तो ग्रुप आहे जगातील दिग्गज क्रिकेटर्सचा. ज्यांच्या घरी पहिली मुलगी झाली, ते सर्व महान क्रिकेटपटू म्हणून पुढे नावारूपास आले. किंवा ज्या क्रिकेटपटूंच्या घरी पहिली मुलगी लक्ष्मीच्या रुपानं आली, ते सर्व महान क्रिकेटपटू झाले, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. आणि हा अनोखा योगायोग विराटच्या बाबतीतही घडून आला आहे. या महान क्रिकेटपटूंच्या यादीत सचिनपासून धोनी आणि लारापासून पाँटिंगपर्यंतच्या अनेक ताऱ्यांचा समावेश होतो. 

क्रिकेटचा देव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या घरातही पहिल्यांदा मुलीचा जन्म झाला होता. सचिनची मुलगी साराचा जन्म १२ ऑक्टोबर १९९७ला झाला होता. सचिन आणि अंजली या दांपत्याला सारा आणि अर्जुन ही दोन मुलं आहेत. सचिनप्रमाणे सारा आणि अर्जुन या दोघांचे लाखोंच्या घरात फॅन्स आहेत. 

सचिनप्रमाणेच भारतीय क्रिकेटमधील दादा माणूस आणि सध्याचा बीसीसीआयचा अध्यक्ष असलेल्या सौरव गांगुलीच्या घरीही पहिल्यांदा मुलीचा जन्म झाला. ३ नोव्हेंबर २००१ रोजी जन्मलेल्या मुलीचं नाव सना ठेवण्यात आलं. टीम इंडियाचा माजी कर्णधार असलेल्या सौरव गांगुलीनं  १ फेब्रुवारी १९९७ रोजी डोना गांगुलीशी लग्न केलं.

देशाला दोन विश्वचषक जिंकून देणारा टीम इंडियाचा माजी कर्णधार कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनी देखील एका मुलीचा पिता आहे. धोनीची मुलगी जीवाचा जन्म २०१५च्या वर्ल्डकप दरम्यान झाला होता. जीवाचेही सोशल मीडियावर बरेच फॅन फॉलोअर्स आहेत. क्रिकेटर्ससोबतचे तिचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत.

तसेच भारतीय संघाचा स्फोटक फलंदाज हिटमॅन रोहित शर्माच्या घरीही पहिलं अपत्य मुलगी जन्मली. रोहित शर्मा आणि रितिका सजदेह यांच्या मुलीचे नाव आहे समायरा. तिचा जन्म ३० डिसेंबर २०१८ रोजी झाला होता. रोहित सोबत समायराचे फोटो चांगलेच ट्रेंडिंग आहेत.

त्याचप्रमाणे जगातील दिग्गज क्रिकेटपटू ब्रायन लारालाही एक मुलगी झाली. त्याने आपल्या मुलीचे नाव सिडनी ठेवले. ब्रायन लाराने १९९३ मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध सिडनी येथे कसोटी कारकीर्दीतलं पहिलं शतक केले होते. त्यामुळे त्याने आपल्या मुलीचे नाव सिडनी ठेवले आहे.

ऑस्ट्रेलियाच्या महान क्रिकेटपटूंपैकी एक रिकी पॉन्टिंगलाही पहिलं अपत्य मुलगी झाली. त्याची पत्नी रियानाने २००८ मध्ये त्यांची पहिली मुलगी एमी चार्लोटला जन्म दिला. सध्या रिकी पाँटिंग आणि रियाना यांना तीन अपत्य आहेत 

भारतीय क्रिकेट संघाचा माजी फिरकीपटू हरभजन सिंग हा देखील एका मुलीचा पिता आहे. भज्जी आणि त्याची पत्नी गीता बसरा यांनी आपल्या मुलीचे नाव हिनाया हीर ठेवले आहे. 

तसेच टीम इंडियाचा माजी खेळाडू सुरेश रैना यालाही ग्रासिया नावाची पहिली मुलगी झाली. तसेच गौतम गंभीर २ मुलींचा पिता आहे. तसेच सध्याचा टीम इंडियाचा कसोटी कर्णधार अजिंक्य रहाणेलाही गेल्या वर्षी आर्या नावाची मुलगी झाली आहे. भारताला पहिला वर्ल्डकप जिंकून देणारे कपिल देव (अमिया), माजी स्फोटक फलंदाज नवज्योत सिंह सिद्धू (रबिया), टीम इंडियाचे कोच रवी शास्त्री (अलेका), ऑल राउंडर रविंद्र जडेजा (निध्याना) आणि फिरकीपटू आर.अश्विन (आध्या आणि अखिरा) यांच्या घरी पहिलं अपत्य मुलगी जन्मली. 

त्याचप्रमाणे दक्षिण आफ्रिकेचा जगप्रसिद्ध क्रिकेटपटू आणि ज्याच्या फिल्डिंगचे चाहते आहेत त्या जाँटी ऱ्होड्स (इंडिया) आणि स्फोटक फलंदाज मिस्टर ३६० एबी डिव्हिलिअर्स (ताज), तसेच न्यूझीलंडचा कॅप्टन केन विल्यमसन यांनीही मुलगी झाली आहे. 

- क्रीडा विश्वातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com