मुंबईचा शरीरसौष्ठवाचा बालेकिल्ला पुन्हा एकवटला; पाच संघटना आल्या एका छताखाली!

5 Mumbai Bodybuilding Associations Unite: अनेक वर्षांच्या फुटीनंतर मुंबईतील पाच प्रमुख शरीरसौष्ठव संघटना एका ध्येयाखाली एकत्र आल्या आहेत. या एकीमुळे राज्य, राष्ट्रीय आणि जागतिक स्तरावर मुंबईचा झेंडा पुन्हा दिमाखात फडकवण्याचा निर्धार करण्यात आला आहे.
5 Mumbai Bodybuilding Associations Unite

5 Mumbai Bodybuilding Associations Unite

Sakal

Updated on

MUMBAI BODYBUILDING UNITY: अनेक वर्षे फुटीच्या विळख्यात अडकलेल्या मुंबईच्या शरीरसौष्ठवाला अखेर एकीचे दमदार बळ मिळाले आहे. मुंबईतील पाच प्रमुख शरीरसौष्ठव संघटना एका ध्येयाखाली एकत्र आल्या असून, आता राज्य, राष्ट्रीय आणि जागतिक स्तरावर मुंबईचा झेंडा पुन्हा दिमाखात फडकवण्याचा निर्धार करण्यात आला आहे.

भारतीय शरीरसौष्ठवात मुंबईला नेहमीच ‘पंढरी’ मानले जाते. देशातील सर्वाधिक दर्जेदार शरीरसौष्ठवपटू घडवणारी ही माती गेली अनेक वर्षे संघटनात्मक फुटीमुळे कमकुवत होत होती. एकेकाळी राष्ट्रीय स्पर्धांवर वर्चस्व गाजवणारे मुंबईचे खेळाडू निवड प्रक्रियेतील गोंधळ, संघटनांतील संघर्ष आणि अंतर्गत मतभेदांमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर मागे पडत होते. परिणामी, जागतिक दर्जाच्या अनेक खेळाडूंना सन्मान, पुरस्कार आणि संधींपासूनही वंचित राहावे लागत होते.

5 Mumbai Bodybuilding Associations Unite
'वर्ल्ड पॅडेल लीग'चा चौथा हंगाम मुंबईत! १२ ऑगस्टपासून रंगणार हाय-व्होल्टेज सामने
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com