Neeraj Chopra : राष्ट्रकुल स्पर्धेतील रौप्यपदकानंतर नीरज चोप्रा पुन्हा मैदानावर... अर्शद नदीमसह पथिरागेचा हिशोब करणार...

Neeraj Chopra Lausanne Diamond League 2026 : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये रौप्यपदक जिंकल्यानंतर नीरज चोप्रा पुन्हा एकदा मोठ्या स्पर्धेसाठी सज्ज झाला आहे. नीरजसमोर पुन्हा एकदा आशियातील प्रमुख प्रतिस्पर्धी अर्शद नदीम आणि रुमेश पथिरागे यांचे आव्हान असणार आहे.
Neeraj Chopra Lausanne Diamond League 2026

Neeraj Chopra Lausanne Diamond League 2026

esakal

Updated on

Lausanne Diamond League javelin throw preview: राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्रा याला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. ८ वर्षांनंतर या स्पर्धेत पुनरागमन करणाऱ्या नीरजसाठी हे खूप मोठे यश होते, परंतु श्रीलंकेच्या रुमेश पथिरागेला त्याला कडवी टक्कर देता आली नाही. रुमेशने निर्विवादपणे सुवर्णपदक पटकावले. आता नीरज याची परतफेड करण्यासाठी सज्ज झाला आहे आणि Lausanne Diamond League मध्ये पुन्हा एकदा नीरज विरुद्ध पथिरागे असा सामना पाहायला मिळणार आहे. यात पाकिस्तानचा अर्शद नदीमही असल्याने आशियातील तीन स्टार भालाफेकपटूंमध्ये कोण बाजी मारतं, याची उत्सुकता आहे. आता ही स्पर्धा केव्हा होणार आणि कुठे पाहता येणार, हे जाणून घेऊयात...

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com