esakal | गुड न्यूज..! आता क्रिकेटही सुरू होत आहे; पण कसं? वाचा सविस्तर...
sakal

बोलून बातमी शोधा

3T.

कोरोना महामारीनंतर दक्षिण आफ्रिकेनेही आपल्या देशातील क्रिकेट पुनरागमनाचे बिगुल वाजवले. तीन संघाची '3 टी' क्रिकेट सामन्याची घोषणा केली आहे.

गुड न्यूज..! आता क्रिकेटही सुरू होत आहे; पण कसं? वाचा सविस्तर...

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

केपटाऊन : कोरोना महामारीनंतर दक्षिण आफ्रिकेनेही आपल्या देशातील क्रिकेट पुनरागमनाचे बिगुल वाजवले. तीन संघाची '3 टी' क्रिकेट सामन्याची घोषणा केली आहे. हे तीन संघ 36 षटकांचा एकाच सामन्यात खेळणार आहे. 27 जून रोजी सेंच्युरियन येथील सुपरस्पोर्टस पार्क येथे सॉलिडेरिटी कप नावाची ही स्पर्धा होणार आहे. 

घरखरेदीने सरकारच्या तिजोरीला मिळाला आधार; लॉकडाऊनमध्ये 'इतक्या' कोटींची महसूलप्राप्ती...​

ही एक नव्या प्रकाराची स्पर्धा असेल. यात दक्षिण आफ्रिकेतील अव्वल 24 खेळाडू असतील. 36 षटकांचा सामना दोन अर्धात खेळला जाईल. लॉकडाऊननंतर दक्षिण आफ्रिकेत सुरू होणारे हे पहिले क्रिकेट असेल. आफ्रिकेत त्याचे थेट प्रक्षेपणही करण्यात येणार आहे. 

भाजप नेता मोहित कंबोज यांच्यावर सीबीआयने केला गुन्हा दाखल; वाचा नेमकं प्रकरण काय....​

कसा आहे हा प्रकार 
 तीन संघ :
एबी डिव्हिल्यर्स (इगल्स),
कागिसो रबाडा (किंगफिशर्स) आणि
क्विन्टॉन डिकॉक (काईट्‌) हे तीन संघांचे कर्णधार. 

  •  36 षटकांचा एकच सामना; पण 18 षटकांचे एक अर्ध. 
  •  एका अर्धात 18 षटकांचा खेळ. त्यात एक संघ दुसऱ्या संघाबरोबर 6 षटके खेळणार (उदा अ वि. ब) 
  •  दुसऱ्या अर्धात प्रत्येक संघ दुसऱ्यांदा फलंदाजी करणार पण यावेळी वेगळ्या संघाबरोबर खेळणार (उदा. अ वि. क) 
  •  सर्व सहकारी बाद झाले तरी अखेरचा फलंदाज एकटा फलंदाजी करू शकणार; पण नॉन स्ट्रायकर कोणीही नसल्यामुळे तो चौकार, षटकार किंवा दोन धावाच काढू शकणार. 
  •  एकच संघ एका अर्धात दोन्ही प्रतिस्पर्ध्यांशी खेळणार असल्याने उत्सुकता ताणली जाणार. पहिल्या चेंडूपासून अखेरच्या चेंडूपर्यंत चुरस कायम असणार. 
  • सर्वाधिक धावा करणाऱ्या संघाला सुवर्ण, दुसऱ्या क्रमांकाला रौप्य आणि तिसऱ्या संघाला ब्रॉंझपदक.

काय म्हणावे या हिमतीला... चक्क पोलिस मुख्यालयातीलच एटीएम फोडले...​

दक्षिण आफ्रिकाच काय पण क्रिकेटविश्वासाठी क्रिकेटची लाईव्ह ऍक्‍शन अनेक महिने पाहायला मिळालेली नाही. 3 टी-क्रिकेटचा हा नवा प्रकार सर्वांसाठी मेजवानी ठरेल. 
- ग्रॅहम स्मिथ, माजी क्रिकेटपटू आणि दक्षिण आफ्रिका क्रिकेटचे संचालक