esakal | भाजप नेता मोहित कंबोज यांच्यावर सीबीआयने केला गुन्हा दाखल; वाचा नेमकं प्रकरण काय....
sakal

बोलून बातमी शोधा

Mohit Kamboj

बँक ऑफ इंडियाची 57 कोटी 26 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी भारतीय जनता पक्षाचे नेता मोहित कंबोजसह चौघांविरोधात केंद्रीय अन्वेषण विभागाने गुन्हा दाखल केला आहे.

भाजप नेता मोहित कंबोज यांच्यावर सीबीआयने केला गुन्हा दाखल; वाचा नेमकं प्रकरण काय....

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मुंबई : बँक ऑफ इंडियाची 57 कोटी 26 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी भारतीय जनता पक्षाचे नेता मोहित कंबोजसह चौघांविरोधात केंद्रीय अन्वेषण विभागाने गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी मुंबईत पाच ठिकाणी शोध मोहिम राबविण्यात आली आहे. दरम्यान, कंबोज यांनी आरोप फेटाळून लावत आपण वन टाईम सेटलमेंटअंतर्गत 30 कोटी रुपये बँकेला 2018 मध्ये भरल्याचे सांगितले.

चिंताजनक बातमी! मुंबईत 'हा' परिसर ठरतोय कोरोनाचा नवा हॉटस्पॉट

बँक ऑफ इंडियाच्या तक्रारीवरून याप्रकरणी सीबीआयने मे. अव्यान ओव्हरसिज प्रा. लि.(सध्याची बाग्ला ओव्हरसिज प्रा.लि.) व त्याचे व्यवस्थापकीय संचालक मोहित कंबोज, जितेंद्र गुलशन कपूर, सिद्धांत बाग्ला, इर्तेश मिश्रा (चौघेही खासगी कंपनीचे संचालक) व केबीजे हॉटेल्स गोवा प्रा.लि. यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सीबीआयने दिलेल्या माहितीनुसार, 2013 ते 2018 च्या दरम्यान फोर्ट येथील बँक ऑफ इंडियाच्या मिड कॉर्पोरेट ब्रांच येथे ही फसवणूक झाली. याप्रकरणी काही बँक अधिकाऱ्यांवरही संशयाची सुई आहे.

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी, तलावक्षेत्रात पावसाची जोरदार हजेरी​

आरोपींनी कट रचून फॉरेन बिल्स निगोसिएशन, एक्सपोर्ट पॅकेजिंग क्रेडिट लिमिटच्या नावाखाली 60 कोटी रुपये मंजूर करून घेतले. ती रक्कम मंजूर करण्यासाठी तसेच मिळवण्यासाठी बनावट कागदपत्रांचा वापर करण्यात आला. तसेच त्याचा वापर दुसऱ्या कामांसाठी करण्यात आला. त्यामुळे बँकेला 57 कोटी 26 लाख रुपयचे नुकसान झाले, असा आरोप आहे.

मोठी बातमी - ...अन्यथा एसटी कामगार 22 जुनपासून जाणार सामुहीक रजेवर​

याप्रकरणी मुंबईतील पाच ठिकाणी शोध मोहिम राबवण्यात आली आहे. त्यात आरोपींचे घर व कार्यालय तसेच खासगी कंपनी यांचा समावेश आहे. या कारवाईत मालमत्ता, कर्ज, बँक खात्याची माहिती व लॉकरच्या चाव्या असे साहित्य हस्तगत करण्यात आले आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरू असल्याचे सीबीआयकडून सांगण्यात आले.

ब्रेकिंग ! अनिल देसाई बाळासाहेब थोरातांच्या भेटीला, काँग्रेसचं नाराजीनाट्य दूर होणार?

याबाबत कंबोज यांच्याशी संपर्क साधला असता 2018 मध्ये एकरकमी तडजोडी अंतर्गत या कर्जाबाबत 30 कोटी रुपये भरले आहेत. याबाबत मला मार्च 2019 मध्ये बँकेने नो ड्यूज सर्टीफिकेटही दिले होते. त्यामुळे कर्जाची रक्कम फेडल्यानंतर अडीच वर्षांनी बँकेने याप्रकरणी का तक्रार केली, हे समजत नाही. त्यांच्याकडून चूक झाली आहे. तरी मी सीबीआयच्या तपासाला सहकार्य करत असून मला त्यांच्यावर पूर्ण विश्वास असल्याचे कंबोज यांनी सांगितले.