NZ Vs IRE : न्यूझीलंडने सेमी फायनल गाठली! ऑस्ट्रेलियावर धावगती वाढवण्याचा दबाव

New Zealand Defeat Ireland
New Zealand Defeat Ireland esakal

New Zealand Defeat Ireland : न्यूझीलंडने आयर्लंडचा सोपा पेपर 35 धावांनी पास करत आपला एक पाय सेमी फायनलमध्ये ठेवला आहे. प्रथम फलंदाजी करणाऱ्या न्यूझीलंडने 20 षटकात 6 बाद 185 धावा केल्या होत्या. मात्र चांगल्या सुरूवातीनंतरही आयर्लंडला 20 षटकात 9 बाद 150 धावांपर्यंतच मजल मारता आली. न्यूझीलंडकडून लोकी फर्ग्युसनने सर्वाधिक 2 तर टीम साऊदी, मिचेल सँटनर आणि इश सोधीने प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. न्यूझीलंडकडून कर्णधार केन विलियम्सनने सर्वाधिक 61 धावा केल्या. आयर्लंडकडून जोशुआ लिटिलने हॅट्ट्रिक घेतली.

New Zealand Defeat Ireland
T20 WC 2022: 'आयसीसीलाच भारताला सेमीफायनल पर्यत न्यायचंय!' आफ्रिदी बरळला

न्यूझीलंडच्या या विजयानंतर आता ग्रुप 1 मध्ये दुसरे स्थान पटकावण्यासाठी इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात स्पर्धा असेल. जर इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया दोघांनीही आपले शेवटचे सामने जिंकले तरी ज्याची धावगती सरस तो सेमी फायनलसाठी पात्र होणार आहे. सध्या इंग्लंडची धावगती +0.547 इतकी असून ऑस्ट्रेलियाची धावगती -0.304 अशी आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलिया रनरेटच्या आधारावर डेंजर झोनमध्ये आहे. आज त्यांचा सामना अफगाणिस्तानविरूद्ध होणार आहे. तर उद्या इंग्लंड श्रीलंकेविरूद्ध भिडणार आहे. ऑस्ट्रेलिया - इंग्लंडसमोर या दोन्ही संघांचे तगडे आव्हान असणार आहे.

New Zealand Defeat Ireland
Attack On Imran Khan : डाव साधणार! पाकिस्तानकडून आशिया कपचे आयोजक पद काढून घेणार?

दरम्यान, अॅडलेडवर ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तान यांच्यातील सामना सुरू होण्यापूर्वी ऑस्ट्रेलियाने आपल्या संघात मोठे बदल केले. कर्णधार अॅरोन फिंच हा मांडीचा स्नायू दुखावल्यामुळे आजचा महत्वाचा सामना खेळणार नाहीये. त्याच्या ऐवजी मॅथ्यू वेड कांगारूंचे नेतृत्व करणार आहे. त्याचबरोबर टीम डेव्हिड आणि मिचेल स्टार्क देखील संघाबाहेर आहेत. स्टार्कच्या ऐवजी केन रिचर्डसन आणि टीम डेव्हिडच्या जागी कॅमेरून ग्रीन संघात आले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com