esakal | INDvsNZ: 'या' फास्ट बॉलरचा विराट कोहली ठरलाय 'बकरा'!
sakal

बोलून बातमी शोधा

Virat-Kohli_NZ

कोहलीने १० डावांमध्ये फक्त एका अर्धशतकासह एकून २०४ धावा केल्या आहेत. कोहलीच्या कामगिरीचा परिणाम टीमच्या कामगिरीवर होत असल्याचेही बोलले जात आहे.

INDvsNZ: 'या' फास्ट बॉलरचा विराट कोहली ठरलाय 'बकरा'!

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

INDvsNZ : ख्राईस्टचर्च : पहिली कसोटी गमावल्यानंतर टीम इंडियाची 'पहिले पाढे पंचावन्न' अशीच काहीशी स्थिती दुसऱ्या कसोटीतही पाहायला मिळत आहे. टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीचीही कामगिरी काही सुधारण्याचं नाव घेईना. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

वेलिंग्टन येथे झालेल्या पहिल्या कसोटीनंतर आता दुसऱ्या कसोटीतही विराट फक्त ३ धावा काढून बाद झाला. न्यूझीलंडच्या टीम साउदीने त्याला बाद केले. याबरोबरच त्याने एक अनोखा विक्रम आपल्या नावावर केला आहे. साउदीने कोहलीला सर्वाधिक बाद करण्याचा अनोखा विक्रम केला. त्याने आतापर्यंत १० वेळा कोहलीला बाद केले आहे. 

यापूर्वी कोहलीला सर्वाधिक वेळा बाद करण्याचा विक्रम इंग्लंडच्या ग्रॅमी स्वान आणि जेम्स अँडरसन यांच्या नावावर जमा होता. मात्र, आता त्यांना साउदीने मागे टाकले आहे. अँडरसन आणि स्वान यांनी कोहलीला ८ वेळा बाद केले आहे. तर दक्षिण आफ्रिकेच्या मोर्ने मॉर्केलने कोहलीला ७ वेळा बाद करण्याचा पराक्रम केला आहे.

- 'ट्‌वेन्टी-20 वर्ल्डकप खेळायचा असेल तर...'; कपिल देव यांचा धोनीला गुरुमंत्र

कोहलीनंतर श्रीलंकेच्या दिमुथ करुणारत्नेलाही साउदीने १० वेळा बाद करण्याचा पराक्रम केला आहे. तर टीम इंडियाचा हिटमॅन रोहित शर्मा या यादीत दुसऱ्या स्थानी आहे. साउदीने रोहितला ९ वेळा बाद केले आहे. 

टीम साउदीने सर्वाधिक वेळा बाद केलेले फलंदाज :

विराट कोहली : १०*
दिमुथ करुणारत्ने : १०
रोहित शर्मा : ९
तमीम इक्बाल : ९
अँजलो मॅथ्यूज : ८

तत्पूर्वी, सलामीला मैदानात उतरलेल्या पृथ्वी शॉला आज सूर गवसला. त्याने अर्धशतकी खेळी करत भारताला चांगली सुरवात करून दिली. त्याने चेतेश्वर पुजारासोबत अर्धशतकी भागीदारी करत वैयक्तिक अर्धशतकही झळकावले. मात्र, त्यानंतर तो जास्त काळ तग धरू शकला नाही. त्याने ६४ चेंडूंत ८ चौकार आणि १ षटकाराच्या बळावर ५४ धावा केल्या. पृथ्वी शॉ बाद झाल्यानंतर कोहली आणि पुजाराने लंचपर्यंत भारताचा धावफलक हलता ठेवला. पण लंचनंतर काही वेळातच विराटही पॅव्हेलियनमध्ये परतला.  

आतापर्यंतच्या न्यूझीलंड दौऱ्यात कोहलीने फक्त एकदा अर्धशतकी खेळी साकारली आहे. पहिल्या वनडे मॅचमध्ये त्याने अर्धशतक झळकावले होते. मात्र, त्यानंतर त्याच्या बॅटमधून धावांची बरसातीला खीळ बसल्याचे दिसून येत आहे. 

- ... तर आयपीएल खेळू नका; कपिल देव यांचा टीम इंडियाला कानमंत्र!

न्यूझीलंड दौऱ्यातील कोहलीची कामगिरी :

टी-२० : ४५, ११, ३८, ११

वनडे : ५१, १५, ९

कसोटी : २, १९, ३

- Women`s T20 World Cup:पोरी सेमीफायनलसाठी सज्ज; श्रीलंकेवर 7 विकेट्सनी विजय

कोहलीने १० डावांमध्ये फक्त एका अर्धशतकासह एकून २०४ धावा केल्या आहेत. कोहलीच्या कामगिरीचा परिणाम टीमच्या कामगिरीवर होत असल्याचेही बोलले जात आहे. त्यामुळे सांघिक कामगिरीसोबत आपली वैयक्तिक कामगिरी सुधारण्यावर कोहलीने भर दिला पाहिजे, असा सल्लाही त्याला दिला जात आहे.